पत्रकारांवरील हल्ल्याच्या गेल्या दोन दिवसात तीन-चार घटना घडल्या.यातील दोन प्रकरणात पोलिसांनीच पत्रकारांवर हल्ले केल्याचं समोर आलंय.पूर्व दिल्लीच्या शाहदरा ठाण्यात पत्रकार हेमंतकुमार शर्मा यांना पोलिसांनी शिविगाळ तर केलीच लाथा-बुक्कयांनी मारण्याची धमकीही दिली.नंतर त्यांची तक्रार घेण्यासही टाळाटाळ कऱण्यात आली.अंतिमतः ती घेतली पण अजून कोणतीच कारवाई केली गेली नाही.
दुसरी घटना वारानसीत घडली.राजाराम तिवारी आणि संदीप त्रिपाठी या दोन वरिष्ट पत्रकारांना पोलिसांनी रस्त्यावरच मारहाण केली.घटनेचा वारानसी पपत्रकारांनी निषेध केलाय.
तिसरी घटना पंजाबच्या बरनाला येथे घडली.तेथे इलेक्टॉनिक मिडियाचे पत्रकार असलेल्य ा पुरी यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली गेली.कार्याळयाचीही मोडताड केली गेली.