कोकणातील प्रकल्पांना आणि सेझला विरोध कऱणारेच आता सेझची उदघाटनं करीत आहे,जैतापूर प्रकल्पा देखील मोदी सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे त्यामुळे सत्तेवर येण्यापुर्वीच आणि सत्तेवर आल्यानंतरची त्यांची भूमिका तपासल्यावर त्यांचे खरे चेहरे समोर येतील अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केली.
अलिबागनजिक कुरूळ येथे काल आयोजित महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर टीकास्त्र सोडले.
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाच्या उत्तरात कोण असेल याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवत माझी मुले राजकारणात नाहीत त्यामुळे त्यांच्या श्रीवर्धनमधील उमेदवारीचा प्रश्नच नाही असे स्पष्ट केले.
मेळाव्यात अनेक कार्यकत्या्रंनी अलिबागची जागा राष्ट्रवादीला मिळावी तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपद अलिबाग तालुक्याकडे द्यावे अशी मागणी केली.