लेफ्ट टू राईट व्हाया कॉंग्रैेस

0
1218

रामशेठ ठाकूर हे पनवेलमधील मोठे उद्योजक.बाधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पनवेल परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय. “ठाकूर इन्फ्रस्ट्रक्चर” हे पनवेल परिसरातील “बॅ्रन्ड नेम” बनलं आहे.मात्र तेवढ्‌यानं रामशेठ ठाकूर समाधानी नव्हते.पैसा आला की,साऱ्यांनाच सत्तेचे डोहाळे लागतात.रामशेठही त्याला अपवाद ठरले नाहीत. राजकारणाची ओढ त्यांना  होती,गरज होती ती योग्य व्यासपीठाची.शेकापनं त्यांची ही गरज पुर्ण केली..1996च्या लाकसभा निवडणुकात दत्ता पाटलांचा पराभव झालेला होता. 1998च्या लोकसभा  निवडणुकात शेकापकडं सक्षम उमेदवार नव्हता..शेकापला नवा चेहरा हवा होता.रामशेठ यांना व्यासपीठ हवं होतं.दोघेही तसे गरजवंत होते.त्यातून रामशेठ — शेकाप युती झाली..रामशेठ शेकापमध्ये गेले याचा अ र्थ त्यांना कार्ल मार्क्स जवळचा होता किंवा दाभाडी प्रबंधाची त्यांनी पारायणं केली होती असं नाही.पनवेल-उरण परिसर तेव्हा शेकापचा बालेकिल्ला होता.राज्य निर्मितीनंतर सलग बारा वेळा पनवेलची आमदारकी शेकापकडंच होती.लोकसभेतही शेकापनं अनेकदा विजय संपादन केलेला होता.1984 चं आंदोलन असो किंवा नंतरचे शेतकरी हिताचे लढे असोत शेकापनं रान उठविलेलं होतं.थोडक्यात शेकापचा सर्वत्र दबदबा आणि बोलबाला  होता.व्यावसायिकदृष्टी असणाऱ्या रामशेठ यांच्यासाठी ही सारी परिस्थिती अनुकूल होती. अन्य कोणत्याही पक्षापेक्षा शेकापत जाणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरणारं होतं.त्याचा हा अंदोज तंतोतंत खरा ठरला हे नंतरच्या काळात ते खासदार झाल्यानं दिसून आलं.रामशेठ शेकापत गेले  आणि  शेकापनंही  कोरीपाटी असलेल्या रामशेठ यांना  थेट लोकसभेची उमेदवारी दिली.योगायोग असा की, तोपर्यत ग्रामपंचायतही न लढविलेले रामशेठ बॅ.अ.र.अंतुले यांचा पराभव करून 1998मध्ये निवडूनही आले. त्यांचा हा विजय दैदीप्यमान यासाठी होता की,तत्पुर्वी अंतुले हे सलग तीन वेळा लोकसभेत निवडून गेले होते.  दि.बा.असतील किंवा दत्ता पाटील असतील यांच्यासारख्या ढाण्या वाघांचाही अंतुलेंसमोर निभाव लागलेला नव्हता.त्या अंतुलेंना कमी मतांनी का होईन रामशेठ ठाकूर यांनी पराभूत केले होते.याचा फायदा असा झाला की, “अंतुलेंना पराभूत कऱणारा नेता” म्हणून रामशेठ एकदम प्रकाशात आले..मात्र त्यांची खासदारपदाची पहिली टर्म अल्पजिवी ठरली.केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आलेे .पण  हे सरकार एक मताने पडले. रामशेठ ठाकूर यांनी तेव्हा  भाजप सरकारच्या विरोधात मतदान केले.”आमच्या एका मतामुळं जातीयवाद्याचं सरकार गेलंअसं सांगत रामशेठ किंवा शेकापच्या पुढाऱ्यांनी तेव्हा यथेच्छा भांडवल केलं होतं .मात्र एका मतामुळं देशाला एका वर्षात निवडणुकांना सामोरं जावं लागलं.एका मतानं कोट्यवधींची धुळधाण केली.नंतर  हाच मुद्दा शेकापनं प्रचाराचा  करीत 1999 मध्ये पुन्हा रामशेठ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविलं.यावेळेस रामशेठ यांना घाबरून बॅ.अ.र.अंतुले औरंगाबादला निघून गेले होते. पु्‌ुष्पा साबळे नावाच्या्‌ एका नवख्या  कार्यकर्तीला कॉग्रेसनं तिकीट दिलं.अशा स्थितीत खरं तर रामशेठ यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी व्हायला हवी होती.तसं झालं नाही.याच काऱण अनपेक्षितपणे रामशेठ यांना दि.बा.पाटलांशी सामना करावा लागला होता. दि.बा.पाटील शेकापमधून शिवसेनेत गेले होते.शिवसेनेने लगेच दि.बां.ना उमेदवारी देऊन रामशेठ यांच्या विरोधात उभे केले.परिणामतः ही लढाई रंगतदार झाली.विजय अ खेर रामशेठ ठाकूर यांचाच झाला.याचं कारण दि.बा.जरी शिवसेनेत गेले होते तरी त्यांच्या जवळचे कार्यक र्तेही शेकापसोडून गेले नव्हते.दि.बा.चं हे पक्षांतर कोणालाच रूचलेलं नव्हतं.विचारांशी प्रतारणा कऱणाऱ्या दि.बां.ना लोकांनी झटका दिला होता. त्याचा फायदा रामशेठ यांना झाला.ते पुन्हा विजयी झाले. – “मात्र हा विजय म्हणजे आपल्या नावाचा करिष्मा आहे’ अशा अहंकारीची बाधा रामशेठ यांना झाली आणि” रामशेठ कोण होते? त्याना आम्ही उचलून खासदार केले” म्हणत शेकापचे काही नेते शेखी मिरवत होते. – परिणातः खासदारकीच्या या काळात शेकापचे अलिबागचे नेते आणि रामशेठ यांच्या फारशे सौहार्द्‌पूर्ण संबंध राहिले नव्हते.जयंत पाटील असोत,पंडित पाटील असोत हे सातत्यानं रामशेठ यांचा अपमानास्पद वागणूक द्यायचे.किमान अशी त्यांची तेव्हा तक्रार असयाचीे. शिवाय दिल्लीत जाऊन रामशेठ यांना फारशी चमकही दाखविता आलेली नव्हती.राजकीय पातळीवरही बदल होताना दिसत होते.रामेशेठ हाडाचे राजकारणी नसले तरी व्यावसायिक असल्यानं  “हवा का रूख” बरोबर ओळखतात.त्याकाळातील  राजकारणातील बदलही त्यामुळंच  त्यांच्या नजरेतून सुटले नाहीेत . त्रयवसाय सांभाळायचा तर “हवा के साथ” चलनं आवश्यक आहे हे त्यांना उमगल आणि  “आपल्याला  दिल्लीतील हवामान मानवत नसल्याचं” कारणं सांगत त्यांनी पक्षात वातावरण निर्मिती करायला सुरूवात केली .  2004च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच त्यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचंही हस्ते परहस्ते नेत्यांच्या कानावर घालायचाही ते प्रयत्न करीत होते. तरीही ऐनवेळी आपण रामशेठ यांना तयार करू असा विश्वास जयंत पाटील यांच्या मनात होता.तो फोल ठरला कारण विषय फक्त लोकसभा लढविण्यापुरताच नव्हता तर रामशेठ यांच्या मनात पक्षच सोडण्याचं नियोजन सुरू होतं. शेकापसाठी हा धक्का होता.त्यामुळंच रामशेठ यांचा उल्लेख जयंत पाटील “रावण”असा करू लागले होते. “गद्दार” अशा शब्दातही रामशेठ यांचा उल्लख अलिबागची मंडळी करायची.  मात्र अशा आक्रस्ताळेपणानं परिस्थिती बदलणार नव्हती.रामशेठ यांनी पक्का निर्धार केला होता.ते एकाच वेळी राष्ट्रवादी आणि कॉग्रेसच्या संपर्कात होते.पण अंतिमतः “कॉग्रेस रूपी सागराचा” मोह त्यांना आवरला नाही.ते कॉग्रेसमध्ये प्रवेश करते झाले. रामशेठ नाहीत म्हटल्यावर   ऐनवेळी विवेक पाटील यांना बळीचा बकरा केला गेला.दरम्यानच्या काळात अंतुले औरंगाबादेत पराभूत होऊन पुन्हा कुलाब्यात आले होते.यावेळेस लढाई झाली ती शेकापचे विवेक पाटील आणि कॉंग्रेसचे अ.र.अंतुले यांच्यात.विवेक पाटील यांचा पराभव झाला.यात रामशेठ यांची तटस्थतःही बऱ्याचअंशी कारणीभूत ठरली होती.नंतरच्या काही दिवसातच मग रामशेठ ठाकूर यांनी शेकापला निरोप देत कॉग्रेसमध्ये अधिकृत  प्रवेश केला.सारेच नाही पण रामशेठ यांनी उपकृत केलेले काही शेकाप कार्यकर्ते कॉग्रेसमध्ये गेले.त्यानंतर पनवेल- उरणच्या राजकारणात रामशेठ विरूध्द शेकाप हा संघर्ष टोकदार होत राहिला.2004मध्ये लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेत विवेक पााटील निवडून तर आले पण नंतरच्या काळात पनवेल नगरपालिका आणि परिसरातील अनेक पंचायतीवर शेकापला पाणी सोडावं लागलं.रामशेठ यांच्या धनशक्तीचा प्रभाव पनवेलमध्ये वाढत होता.अशा स्थितीत चौथ्यांदा पनवेलची लढाई आपणास महागात पडू शकते हे चाणाक्ष विवेक पाटलांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी2009मध्ये  उरणच्या दिशेनं कूच केली.कॉग्रेसच्या प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात बाळाराम पाटील बळीचा बकरा ठरले.वस्तुतः – विवेक पाटलांनी पनवेल लढविली असती तर चित्र वेगळे दिसले असते पण सेनापतीनंच पळ काढल्यानं सेना रणांगणात उतरण्यापुर्वीच  पराभूताच्या मानसिकतेत गेली.त्याचा फायदा प्रशांत ठाकूर यांना मिळाला.नंतर शेकापनं हा विजय धनशक्तीचा असल्याची प्रतिक्रिया दिली पण त्याला अ र्थ नव्हता.

–                                                 रामशेठ यांनी काय मिळविलं?

 एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की,रामशेठ कॉग्रेसमध्ये गेले ऩसते तर 2009मध्ये प्रशांत ठाकूर  आमदार झाले नसते.शेकापनं पुन्हा विवेक पाटील यांनाच तिकीट दिलं असतं.काऱण ते स्टॅडिंग आमदार होते.म्हणजे पहिल्या झटक्यात मिळालेली आमदारकी हा रामशेठ यांचा राजकीय लाभ होता.व्यावयायिक लाभही अनेक झाले.पण  रामशेठ यांचं तेवढ्यावर समाधान होत नव्हतं.त्यांना मुलासाठी लालदिवा हवा होता.अशोक चव्हाण असतील किंवा नंतर पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी अनेकदा त्यांना  लालादिव्याची गाजरं दाखविली. ही आश्वासनं प्रत्यक्षात कधी आलीच नाहीत.प्रशांत ठाकूर हे राहूल ब्रिगेडमधील आहेत,राजीव सातव यांच्याशी त्याचं जवळचे संबंध आहेत त्यामुळं  .प्रशांत ठाकूर आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार अशा वावड्या उठत होत्या  रामशेठ यांचे भाटही  वेळोवेळी तसे सांगत सांगत होते.मात्र लाल दिव्याची वाट बघत बघतच पाच वर्षे निघून गेले.कॉंग्रेस  कल्चरमध्ये लॉबिंगला फार महत्व असते.नुसत्या थैल्या  मोकळ्या करूनही भागत नाही तर एखादा गट जवळ असला पाहिजे.या लॉबिंगमध्ये रामशेठ आणि प्रशांत ठाकूर कमी पडले.मंत्रालयात जाण्यासाठीही त्यांना मध्यस्थ लागायचा.या मध्यस्थांचाही प्रशांत ठाकूर यांच्या लालदिव्यापेक्षा रामशेठ यांच्या खिश्यावर डोळा असायचा.त्यामुळं खिसे मोकळे झाले पण लाल दिव्याची मिजास अनुभवता आली नाही.हे शल्य रामशेठ यांना कायम होतं आणि आजही आहेच आहे..

 –                                                                  भाजपच्या दिशेनं…

देशातील राजकारणानं 2014मध्ये पुन्हा नवं  वळण घेतलं होतं.मोदी महात्म्याची जादू देशभर धमाल उडवत होती.कॉग्रेसचं पानिपत ठरलेलं होतं.हा बदलही व्यावसायिक रामशेठ यांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं.तरीही घाई न करता लोकसभेत काय होतंय ते पाहावं अशा व्यावहारिक विचार करीत रामशठ “वेट अ्रन्ड वॉच”च्या भूमिकेेत  होते.अपेक्षेप्रमाणं लोकसभेत कॉग्रेसची दाणादाण उडाली.केंद्रात मोदींची एकहाती सत्ता आली.पुढील पाच वर्षे तरी आता मोदींना कोणी हात लावू शकत नाही हे ही  स्पष्ट झाले  होतंं.अशा स्थितीत केंद्रातील सत्तेशी दुरावा  रामशेठ यांना व्यावसायिकदृष्टया परवडणारा नव्हता.सत्तेशी जुळवून धणं,सत्तेच्या जवळ असणं आवश्यक आहे हे ओळखत मग त्यांनी भाजपला जवळ करायचं ठरविलं आहे.मात्र हा आपला अंतस्त हेतूही जक्षाला कळला नाही पाहिजे यासाठी आपल्या निर्णयाला  तात्विक मुलामा देणं आवश्यक होतें .शेकाप सोडताना “शेकापचे नेेते आपणास सन्मानाची वागणूक देत नसल्याचं” गा़ऱ्हाणं त्यांनी गायलं होतं.आता त्यांनी खारघरच्या टोलच्या प्रश्नाचं भांडवल करायचं ठरविलेलं होतं.खरं तर खारघरच्या टोलमधून सुट मिळणं शक्य नाही हे व्यावसायिक रामशेठ यांना माहित होतं. टोल रद्द करायचा तर ठेकेदाराला जवळपास हजार कोटी रूपये द्यावे लागले असते. आज सरकारची तेवढी ऐपत नव्हती आणि एमएमआरडीए किंवा सिडको ही रक्कम द्यायला तयार होणं शक्यच नव्हतं.त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण हतबल झाले.रामशेठ ठाकूर भाजपच्या संपर्कात आहेत म्हटल्यावर त्यांनीही रामशेठ यांच्या आरोळ्यांकडं दुर्लक्ष केलं. त्याचं जुलैचं आंदोलन किवा प्रशांत ठाकूर यांचा राजीनामाही  त्यांनी फार गांभीर्यानं घेतला नाही.रामशेठ इशारे देत होते तरीही त्यांना कोणी चर्चेला बालावले नाही किंवा त्यंीची कोणी मनधरणीही केली नाही.त्यांना भाजपमध्ये जाऊ नका म्हणून सागायलाही कॉग्रेसकडून कोणी आलं नाही.कॉग्रेसमध्ये ब्लॅकमलिंग चालत नाही,असा प्रयत्न  करणाऱ्या नारायण राणे यानाही कॉग्रेसनं भिक घातली नाही तर एका शहरापुरता प्रभाव असलेल्या रामशेठ यांच्या दबावनितीला कॉग्रेस बळी पडेल हे शक्य नव्हतं.खरं तर हे वास्तव रामशेठ यांच्या पगारी राजकीय सल्लागारांनी त्यांच्या नेरेस  आणून द्यायला हवं होतं पण तसं झालेलं नसावं.त्यामुळं कॉग्रेस सोडण्याचा नि र्णय रामशेठ यांनी घेतलेला असावा असं म्हणायला जागा आहे.टोल रद्द कऱणं किंवा माफ कऱणं हे एवढं सोपं नाही.कोल्हापूरची जनता गेली अनेक दिवस टोल रद्द करावा या मागणीसाठी टाहो फोडते आहे पण सरकार तसं करू शकत नाही.खारघरच्या टोलबाबतही हेच आहे.रामशेठ यांना हे कळत नसावं असं नाही पण त्यांना निमित्त हवं होतं.ते त्यांनी शोधलं.ते शोधतानाही ज्या दिवशी आचारसंहिता लागू होतेय त्याच दिवशी राजीनामा देण्याची खेळी खेळली.म्हणजे मार्गच बंद झाला पाहिजे. “राजीनामा दिल्यानंतर जनतेसाठी आमदारकी भिरकावून दिली” म्हणत त्यागाच्या गोष्टी आळवायला त्यांनी सुरूवात केली.वास्तव असं होतं की,आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्यांची अप्रत्यक्षपणे आमदारकी संपलीच होती.त्याग करायचाच होता तर तो यापुर्वीच केला असता तर तो चमकदार ठरला असता.निवडणुका एक महिन्यावर राहिल्यानंतर आमदारकी सोडली म्हणण्याला तसा फारसा अ र्थ उरत नाही.जनता आंधळी आणि बहिरी नाही.जनतेला सारं काही कळतं,कोण काय आणि कशासाठी करतंय हे समजण्याएवढी प्रगल्भता आता मतदारांमध्ये नक्कीच आलेली आहे.मात्र राजकारणी जनतेला काही समजतच नाही अशा भूमिकेतून आपल्या खेळ्या आणि वक्तव्य करीत असतात.

                                                                          पुढे काय ?

  – नवी मुंबई विमानतळ असेल किंवा जेएनपीटी बंदराला जाडणाऱ्या रस्त्याचं आठपदरीकरण असेल नाही तर जेएनपीटीचा सेझ असेल असे अनेक विकास प्रकल्प पनवेल-उरणच्या परिसरात येत आहेत.येत्या काही दिवसात 35 हजार कोटी रूपयाची गुंतवणूक रायगडात होतेय. ..यावर अनेकांप्रमाणंच रामशेठ ठाकूर यांचाही डोळा असणं स्वाभाविक आहे.ही सारी किंवा यातील  काही कामं आपल्या कंपनीसाठी  मिळवायची असतील तर सत्त्चेच्या जवळ असणं आवश्यक आहे हे रामशेठ यांना कोणी सांगण्याची जरूरी नाही.ते उपजत ज्ञान त्यांच्याकडं आहे. छराभूत कॉग्रेसमध्ये राहून यातील वाटा आपणास मिळणं अवघड आहे ( किंवा राष्ट्रवादीला भवितव्य नाही आणि शिवसेना आपला हेतू साध्य करू शकत नाही त्यामुळं तिकडं फिरकून उपयोग नाही) याचा साक्षात्कार रामशेठ यांना झाला आणि त्यांनी नव्या सत्तेशी जुळवून घ्यायला सुरूवात केली. ते आज उद्या भाजपमध्ये जातीलही पण किमान राजकीयदृष्टया त्यांचा प्रवास सुखाचा असणार नाही.याची काही कारणं आहेत.पहिलं कारण म्हणजे रामशेठ नेहमीच सत्तेच्या परिघातच असतात हे सत्य आता समोर आल्यानं त्यांच्यावर भाजपवालेही किती विश्वास ठेवतील हा प्रश्नच आहे.शिवाय रामशेठ यांच्या एका मतानं वाजपेयीचं सरकार पडलं होतं ही घटना भाजपवाले विसरलेले नाहीत किंवा ते पुढंही विसरणार नाहीत.त्यामुळंही त्यांनी भाजपमध्ये कितीही दिवस मुक्काम केला तरी ते भाजपच्या इ नर सर्कलमध्ये कधीच प्रवेश मिळवू शकणार नाहीत. पुढच सोडा पनवेलचं तिकीट पदरात पाडून घेण्यापासूनच त्यांच्या अग्निपरीक्षेला सुरूवात होईल.पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपचं अस्तित्व न गण्य आहे.शिवसेना तेथे प्रभावी आहे.पनवेलची जागा सेना भाजपसाठी सोडण्याची शक्यता नाही.,समजा सोडली तरीही रामशेठ निवडणून आले तर पुन्हा ही जागा कायमच भाजपच्या वाट्याला जाईल या भितीनं शिवसैनिक भाजपमधील या अगंतुक नेत्यासाठी  काम करतीलच असं नाही.धनशक्तीच्या माध्यमातून काही नेत्यांना वश केले तरी सामांन्य शिवसेनिक कमालीचा निष्ठावान असल्यानं तो कोणत्याही लाभाला बळी पडणार नाही. अशा स्थितीत बाळाराम पाटलांसमोर ही  निभाव लागणार नाही. शिवाय रामशेठ गेले म्हणजे सारी कॉग्रेस त्यांच्याबरोबर जाईल असं नाही.श्याम म्हात्रे,महेंद्र धरत यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही.पक्षातील  पुर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आहेत ते रामशेठ चालले म्हणून भाजपमध्ये जातील हे संभवत नाही.त्यामुळं जुने कॉग्रेसवाले प्रशांत ठाकूर यांना पराभूत कऱण्यासाठी निर्धारानं प्रयत्न करणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही.म्हणूनच रामशेठ यांच्यासाठीचा हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही.दि.बा.पाटील आणि रामशेठ यांची बरोबरी होऊ शकत नाही पण आयुष्यभर शेतकरी आणि सामांन्यासाठी झटणाऱ्या आणि चार वेळा पनवेलचं विधानसभेत आणि दोन वेळा कुलाब्याचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेल्या दि.बा.पाटील यांनी जेव्हा लाल बावटा टाकून भगवा खांदयावर घेतला तेव्हा त्यांनाही मतदारांनी क्षमा केली नाही.तेव्हा पनवेलची ही जनता रामशेठ ठाकूर यांना माफ करेल असं जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. राम शेठ यांचा  आपल्या धनावर मोठा विश्वास आहे.पण ते हे विसरतात की  साऱ्याच माणसांना पैश्यानं खऱेदी करता येतं नाही , सारेच पैश्याच्या मोहाला बळी पडतात असंही  अजिबात नाही. तत्वाला चिकटून राहणारे आणि तत्वासाठी कितीही मोठा त्याग करणारे असंख्य सामांन्य माणंसं आपल्या अवती-भवती असतात आणि अशीच माणसं तत्वभ्रष्ट मंडळींना ताळ्यावर आणण्याचं काम करीत असतात.लोकांशी आणि विचारंाशी द्रोह केल्यानं अनेक राजवटी धुळीस मिळाल्या, कित्येक साम्राज्य उद्धवस्थ झाली. नियतीनं कोणालाही माफ केलेलं नाही,ती नियती आपणास अपवाद करेल  हा समज कोणीही बाळगू नये.रामशेठ ठाकूर यांना एवढंच सांगणं आहे की,जी पक्षांतराची खेळी एकदा यशस्वी झाली ती पुनः पुन्हा यशस्वी होईलच याची अजिबात खात्री नाही.कॉग्रेसमध्ये जाऊन जे राजकीय नैराश्य रामशेठ यांच्या पदरी आले त्यापेक्षाही अधिक विदारक स्थिती भाजपमध्ये होऊ शकते.कारण कॉग्रेस कल्चर परवडले पण भाजप … लवकरच त्यांना याची प्र ची ती येईल

    एस.एम.देशमुख

या लेखाची कॉपी आपणास   http://smdeshmukh.blogspot.in/2014/09/blog-post_18.html          येथून करता येईल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here