तेलुगूतील चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. एका वाहिनीवर रामायणसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या विधानानंतर महेश यांनी परिपूर्णानंद सरस्वती यांच्याशी वाद घातला होता. या प्रकरणात पोलिसांनी परिपूर्णानंद सरस्वती यांना देखील स्थानबद्ध केले आहे.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीवर एका चर्चेदरम्यान महेश यांनी प्रभू श्रीराम, सीता आणि रावण यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी हैदराबादमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानातील २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. २ जुलै रोजी पोलिसांनी काथी महेश यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर व्हावे, असे सांगितले होते.

महेश यांना तडीपार यांना हद्दपार केल्यानंतर तेलंगणात वाद निर्माण झाला आहे. तेलंगणमधील केसीआर सरकार परिपूर्णानंद स्वामी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या सुजाता यांनी विचारला. महेश यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, असे सांगत पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांनी कारवाईचे समर्थन केले आहे. पोलिसांनी परिपूर्णानंद सरस्वती यांना देखील स्थानबद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here