ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0
739

औरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची चेष्टा करीत कार्यालयातून ‘एक्झिट’ घेत असत. आजही त्यांनी अशीच हसत-खेळत कार्यालयातून एक्झिट घेतली आणि थोड्या वेळानंतरच त्यांनी जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याची दुर्दैवी वार्ता कार्यालयात येऊन धडकली. दररोज त्यांची एक्झिट कार्यालयातील प्रत्येकाला आनंद देऊन जात असे. आज मात्र त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला कायमचीच चटका लावून गेली.

शनिवारी रात्री हृदयविकाराने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ५९ वर्षांचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here