शिखर बॅंक घोटाळ्यात शरद पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध होता की नाही ते चौकशीअंती स्पष्ट होईल.. त्यामुळं शरद पवार यांच्यावर इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा ज्यांना निषेध करायचाय त्यांनी तो जरूर करावा.. मुददा तो नाही.. शिखर बॅंक असेल किंवा अनेक जिल्हा बॅंका असतील तेथे दिवसाढवळया लूट झाली आहे..हे कोणी नाकारत नाही.. या लुटीतून अनेकांनी आपल्या तुंबड्या भरल्या.. त्याची चौकशी व्हायला हवी की नको? हा कळीचा मुद्दा..
निवडणुकांच्या तोंडावर गुन्हे दाखल करण्यामागं काही राजकारण असूही शकेल.. नाही असं नाही.. पण त्यामुळं विषयाचं गांभीर्य कमी होत नाही.. ज्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले आहेत ते सत्तेवर असताना या विषयाबाबत मौन का बाळगून होते? त्यांनी हे प्रकरण दडपविणयाचा प्रयत्न केला..मात्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आजच्या सतताधारयांनाी तो विषय हाती घेतला असेल तर त्यात अस्वाभाविक असं काही नाही..ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांनी काही केलेलंच नसेल आणि ही सारी मंडळी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असेल तर त्यांनी चौकशीला घाबरण्याचं कोणतंच कारण नाही.
शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानं कोणाचा राजकीय फायदा किंवा नुकसान व्हायचं ते होओ..जनसामान्यांना त्याच्याशी घेणं नाही.. शेतकरयांचे कोट्यवधी रूपये निर्लज्जपणे हडप करणारांची चौकशी होणार असेल आणि त्यातून खरे लुटारू जगासमोर नागडे होणार असतील तर अशा चौकशीचं स्वागतच केलं पाहिजे… ते होताना दिसत आहे..

LEAVE A REPLY