चॅनलवर पाहुण्यात लाइव्ह हाणामारी

  0
  847

  अम्मान : टीव्हीवर चर्चा करणारे हे त्या-त्या विषयातील तज्ज्ञ समजले जातात. त्यामुळं आपण अशा तज्ज्ञांना विश्लेषण करताना नेहमी पाहतो. अनेक जोरदार चर्चाही रंगताना आपण पाहिल्या असतील. पण हेच टीव्हीवर चर्चा करणारे तज्ज्ञ जर थेट हातघाईवर येऊन एकमेकांशी हाणामारी करत असतील तर.. हो असाच काहीसा प्रकार जॉर्डनमध्ये एका न्यूज चॅनेलच्या लाईव्ह चर्चेत घडला.

  टीव्हीवरची चर्चा इतकी जोरदार झाली की, या चर्चेतले गेस्ट उठून चक्क हाणामारीच करु लागले. सध्या गाझापट्टीत सुरु असलेल्या प्रश्नावरुन आणि सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्याबाबत ही चर्चा सुरु होती.या चर्चेत पत्रकार शकेल अल जोहरी आणि वकील समिह क्राईस हे सहभागी झाले होते. या चर्चेदरम्यान वातावरण इतकं तापलं की अल जोहरी यांनी आपल्या गेस्टच्या दिशेनं पाण्याची बाटल फेकून मारली. त्यानंतर या स्टुडिओचा चक्क आखाडा बनला. स्टुडिओतल्या कर्मचाऱ्यांना ही भांडणं आवरण्यासाठी धावावं लागलं. विशेष म्हणजे हा सारा प्रकार चॅनेलवर लाईव्ह सर्वांना दिसला    (एबीपी माझावरून साभार)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here