चार्ली हव्दोचा अंक हातोहात विकला

0
749

दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच प्रकाशित होत असलेल्या फ्रान्समधील व्यंगसाप्ताहिक चार्ली हेब्डोचा अंक घेण्यासाठी नागरिकांनी दुकानांवर मोठी गर्दी केली होती. चार्ली हेब्डोच्या पॅरिसमधील कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्यंगसाप्ताहिक चार्ली हेब्डोने ५० लाख अंक छापले आहेत. तसंच साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर पुन्हा पैगंबराचे कार्टून काढले आहे. या कार्टूनमध्ये कव्हर पेजवर पैंगबराच्या हाती ‘मी चार्ली आहे’ असं लिहिलेलं असून रडताना दाखवलं आहे.

साप्ताहिकाचे अंक अनेक ठिकाणी संपले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा पहिलाच अंक असल्याने चार्ली हेब्डोने आधी ३० लाख अंक छापले होते. पण लगेचच विकले गेल्यानंतर संख्या वाढवून ५० लाख अंक छापण्यात आले. यापूर्वी चार्ली हेब्डो साप्ताहिक फक्त ६० हजार अंकच आठवड्याला छापत होते. आता छापलेल्या अंकाकडे ‘सर्वाईवर्स इश्यू’ म्हणून बघितलं जातंय. म्हणजे अंकाच्या विक्रीतून मिळणारा पैसा हा हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.

चार्ली हेब्डोने साप्ताहिकात पुन्हा पैगंबराचे कार्टून छापण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लिम जगतातून त्याचा निषेध केला जातोय. तसंच कट्टरतावाद्यांकडून वेबसाइट्सवर धमक्याही दिल्या गेल्या आहेत. अशाप्रकारे कार्टून छापणं हा मूर्खपणाचा कळस आहे, आयएसआयएसने या दहशतवादी संघटनेने आपल्या रेडिओवरनं म्हटलंय. दरम्यान, पॅरिसमधली हल्ल्याची जबाबदारी येमेनमधील अल-कायदाच्या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे.( मटावरून साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here