” चांदूरकरी ड्रामा” लोकांना अमान्य

0
913

मुंबई प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी काल एबीपी माझा वर जो ड्रामा केला त्याच्यावर आज विविध नेत्यांनी सोयीनुसार प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेहमी प्रमाणे बघतो,पाहतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.अजित पवार यांनी नेल्सनच्या पोलवरून जिथं कमी आहोत तिथं तयारी करता येईल असं मत व्यक्त केलं.आर आर पाटील यांनी एबीपी माझावरील पोल भाजपसाठी आहे.चॅनेल्स भांडवलदारांच्या हाती गेली आङेत त्यातून हे सारं घढतंय असं म्हटलंय.देवेद्र फडणवीसांनी चांदूरकरनी असा त्रागा करायला नको होता असं म्हटलंय.बहुसंख्य वाचकांनाही असंच वाटतंय की,चांदोरकरांनी असा ड्रामा करण्याऐवजी प्रवक्ताा म्हणून प्रत्येक आरोपांना खंबीरपणे उत्तर द्यायला हवं होतं असं मत व्यक्त केलंय.बातमीदारच्या पोलवर देखील लोकांनी नकारात्मक सूर आळविला आहे.
एखादया वक्त्याने टीव्ही वरील चर्चा अर्ध्यावर सोडून जाण्याची मराठी चॅनल विश्वातील ही दुसरी घटना असावी.एकदा आयबीएन-लोकमतच्या चर्चेत सनातन प्रभातचे संपादक आणि निखिल वागळे यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर सनातनचे संपादक चर्चा अर्धवट सोडून निघून गेले होते असे स्मरते.वाहिन्यांवरील चर्चा ही गंभीरपणे व्हायला हवी.पण अलिकडे हे गांभीर्य हरवत चालले असे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here