*चलो अंबाजोगाई!!*

राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा*

*मराठी पत्रकार परिषद, बीड* आणि *अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकार संघ* यांच्या सयुंक्तरित्या आयोजित
२० सप्टेंबर २०१८ रोजी *जिल्हास्तरीय अधिवेशन*

*२० सप्टेंबर २०१८* वार गुरुवार रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अंबाजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या बीड जिल्हा स्तरीय अधिवेशनासाठी उदघाटक म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते
*मा. ना. धनंजयजी मुंडे* प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ माध्यम तज्ञ व सुप्रसिद्ध वृत्त निवेदक *समीरन वाळवेकर* व महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे माहीती संचालक मा. *यशवंत भंडारे* पत्रकार परिषदचे विश्वस्त मा. *एस. एम. देशमुख*, किरण नाईक, अध्यक्ष मा. सिद्धार्थ शर्मा, सरचिटणीस अनिल महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष
म्हणून मा. *राजकिशोर पापा मोदी* असणार आहेत.
या अधिवेशनात ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळावी, पेंशन,संरक्षण मिळावे यासाठी मराठी पत्रकार परिषद लढा देत आहे.या वेळी विविध पुरस्कार देऊन राज्यातील मान्यवर पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पत्रकार व ग्रामीण भागातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. हि नम्र विनंती.

*मराठी पत्रकार परिषद*,
. *बीड*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here