त्नागिरीच्या दक्षिणेला 15 किलो मिटर अंतरावर पावस आहे.उत्तरेला 25 किलो मिटरवर गणपतीपुळे आहे.निसर्ग आणि आध्यात्माचा वारसा लाभलेली ही दोन्ही गावं रत्नागिरी जिल्हयाच्या वैभवात भर घालत आलेली आहे.पावसला जाताना एस.एम.जोशी यांचं गाव लागतं.गणपतीपुळे जवळ केशवसुताचं सुंदर गाव आहे.दोन्ही गावातलं निसर्गाचं वर्णन काय करावं ते केवळ अनुभवलंच पाहिजे.

दोन्हीकडं भाविकांची मोठी गर्दी असते.मात्र दोन्ही क्षेत्रांमध्ये मुलभूत फरक आहे.गणपतीपुळेला येणारा ‘क्राऊड’ हा मुलतः पिकनिकला आलेला असतो.मुद्दाम दर्शनासाठी 30 टक्के पर्यटक येतात  .70 टक्के पर्यटक फिरायला येतात.’आता आलोच आहोत तर गणरायांनाही नमन करून घेऊ’ अशी त्यामागची भावना असते.त्यामुळं जो भक्तीभाव,जे पावित्र्य पावसला दिसते तसे गपणतीपुळे येथे दिसत नाही.बिचवर फिरण्यासाठी जो वेष घातला जातो त्याच ‘अवतारात’ अनेकजण मंदिराची पायरी चढतात .कोणते कपडे घालून मंदिरात जावे याला बंधन नाही मात्र मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी कोणते कपडे घालावेत याची काही पथ्ये पाळावीत असं देवस्थानचं आवाहन असतं.गोंधळ,गडबड,फोटो काढण्यासाठीची धडपड ,गोंगाट हे गणपतीपुळे येथे जाणवतं.दर्शन उरकून मंदिराच्या पार्श्‍वभूमीवर फोटो काढण्याचीच घाई सर्वांना झालेली असते.समोरच समुद्र असल्यानं त्याचीही ओढ असतेच.दोष पर्यटकांचा नाही.कारण देवदर्शन हा त्यांचा मुख्य उद्देश नसतो.पिकनिक मुडमध्ये ते असतात.तरीही 30 टक्के का होईनात भाविक मुद्ाम दर्शनासाठी आलेले असतात.त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते.ती घेतलीच गेली पाहिजे.

मात्र देवस्थान समितीचं कौतूक यासाठी केलं पाहिजे की,ते यासाठी मुद्दाम प्रयत्न करीत असतात.शिवाय येणार्‍या भाविकांची आणि पर्यटकांचीही सोय व्हावी यासाठीही त्यांची धडपड सुरू अशते.गणपतीपुळेत पुर्वी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा तेव्हा एमटीडीसीत राहिलो तर 2200 किंवा सिझनमध्ये त्यापेक्षा जास्त भाडं द्यावं लागायचं.अन्य लॉजमध्येही दीड-दोन हजार रूपये एका रात्रीसाठी उकळले जायचे.आता सुसज्ज असं भक्त निवास बांधलं आहे.एकाच वेळी शेकडो पर्यटकांची व्यवस्था तेथे होते.साध्या रूम्सपासून एसी रूम्सपर्यंत सर्व व्यवस्था तेथे आहे आणि ती माफक दरात.एसीरूम आपल्याला केवळ 800 रूपयात उपलब्ध होते. मंदिराचे प्रमुख सरपंच डॉ.विवेक भिडे यांची त्यांच्या मालगुंड येथील घरी जाऊन मुद्दाम भेट घेतली.त्यांनी हे भक्ती निवास झाल्यामुळं भक्तांची कशी व्यवस्था झाली हे विस्तारानं सांगितलं.साध्या रूम्सपासून एसीपर्यंत अगदी गरीब आणि मध्यमवर्गीय पर्यटक डोळ्यासमोर ठेऊन याची रचना केली गेलीय असं त्यांनी सांगितलें.( इच्छूकांसाठी भक्त निवासचा फोन नंबर 02357 235754 किंवा 235755 असा आहे) महाप्रसादाची व्यवस्थाही मोफत केली गेली आहे.त्यामुळं स्वाभाविकपणे गावातील हॉटेल आणि लॉजवाल्यांची दुकानदारी मोठ्या प्रमाणावर थांबली आहे.विवेक भिडे म्हणाले,भक्तांनी मंदिराचं पावित्र्य जसं सांभाळलं पाहिजे तव्दतच भक्ती निवासाचं पावित्र्यही सांभाळलं पाहिजे.विवेक भिडे हे व्यवसायानं डॉक्टर आहेत.विविध चळवळीतील त्यांचा सहभाग असतो.पर्यावरणाच्या चळवळीतही ते काम करतात.ते शेतीही करतात.अत्यंत कल्पक आणि अभ्यासू अशी ही व्यक्ती आहे.त्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारताना कोकणाशी संबंधित अनेक विषय नव्यानं समजले.विवेक भिडे यांनी आणखी एक तक्रार केली.गणपतीपुळ्याच्या समुद्राची ‘माणसं खाणारा समुद्र’ वगैरे अशी बदनामी केली गेलेली आहे.त्यामुळं त्याचा पर्यटकांवर नक्कीच परिणाम ङोतो.वास्तव असं काही नाही.निसर्गाची छेडछाड न करता आपण निसर्गाचा आनंद घेतला तर आपलं पर्यटन नक्कीच आनंददायी होतं.समुद्रात उतरताना समुद्राची माहिती आणि त्याचे धोके समजून घेतले तर अपघात होत नाहीत.पर्यटकांनी आपली काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.ते योग्य देखील आहे.प्रत्येक ठिकाणच्या समुद्राच्या काही विशिष्ठ रचना असतात.गणपतीपुळेचा समुद्र काठावरच खोल आहे.त्यामुळं थोडं जरी पुढं गेलं तरी माणूस आत ओढला जातो.पर्यटकांनी त्यादृष्टीनं काळजी घेतली पाहिजे.

पावसचा निसर्ग अक्षरशः वेडलावणारा आहे.स्वामी स्वरूपानंदांचा जो मठ येथे आहे तेथील व्यवस्था आणि शांतता खरंच अनुभवावी अशी असते.देसाई बंधू आंबेवाले हे तेथील सारी व्यवस्था पाहतात.परिसर एवढा शांत आणि स्वच्छ आहे की,कागदाचा एक तुकडाही तेथे तुम्हाला दिसणार नाही.पावसला येणारे शंभर टक्के वाभिकच असतात आणि ते केवळ आणि केवळ दर्शनासाठीच आलेले असतात.त्यामुलं कितीही भक्त तेथे आले तरी निरव शांतता असते. मला हे मंदिर फार आवडतं.तेथे ध्यान कक्ष आहे.तेथे मी काही क्षण न चुकता थांबतोच थांबतो.यावेळेसही काही क्षण मी ध्यान कक्षात घालून मौनाचा आणि ध्यानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.मंदिराची व्यवस्था पाहणारे देसाई बंधू भेटले.ते म्हणाले,’मी जवळपास 24 तास येथेच असतो.मंदिराचे पावित्र्य सांभाळले जावे यासाठी आमचा कटाक्ष आणि  आग्रह असतो.दररोज शेकडो भक्त येत असतात आणि मोठा आध्यात्मिक आनंद घेऊन जातात’पावस हे गावही मालगुंड सारखंच निसर्गरम्य..निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे.रत्नागिरीला गेल्यावर आपण गणपतीपुळे येथे जातोच जातो पण पावसला जायलाही हवंच.मी धार्मिकवृत्तीचा माणूस नाही पण मंदिराचं व्यवस्थापन कसं असावं हे पाहण्यासाठी तरी मुद्दाम पावसला गेलंच पाहिजे.त्यानिमित्तनं अनोखा निसर्गही आपल्याला अनुभवता येतो.मी तो अनुभव पुन्हा घेतला आहे.मन प्रसन्न झालं.आमचे रत्ननागिरी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हेमंत वणजू आणि पावसचेच पत्रकार मित्र प्रसाद हचरेकर यांना मुद्दाम धन्यवाद दिले पाहिजेत की,त्यांच्यामुळं पुन्हा एकदा मी किरण नाईक,सुनील वाळुंज आणि स्वप्नील  नाईक अशा सर्वांना हा आनंद घेता आला. (कोकणातील शेती आणि शेतीच्या व्यथा आणि शेतीत होत असलेले बदल उद्या याच ठिकाणी )

छायाचित्रात मध्यभागी दिसणारे विवेक भिडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here