आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना आज पुन्हा एकदा दिल्लीतील सुल्तानपुरी भागात रोड शो दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने थप्पड लगावली.
दिल्लीतील सुलतानपुरीमध्ये केजरीवाल प्रचारासाठी रोड शो करत असताना अज्ञात व्यक्तीने केजरीवाला यांना थप्पड लगावली. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठा गदारोळ झाला. थप्पड लगावणाऱया व्यक्तीला ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आठ दिवसांतला केजरीवाल यांच्यावरचा हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वीहीदक्षिण दिल्लीतल्या रोड शो दरम्यानही केजरीवाल यांच्यावर अशाचप्रकारे हल्ला झाला होता.वाराणसीमध्येही केजरीवाल यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता.