कुर्ला स्थानकावर महिला पत्रकाराची छेडछाड

0
1002

मुंबईः पुन्हा एकदा महिला पत्रकाराची छेडछाड केल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानकावर घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. महिला पत्रकार रात्री घरी जात असताना हा प्रकार घडला.

मुंबईत रात्री महिला सुरक्षित असल्याचे अनेकदा दावे केले जातात. मात्र महिला पत्रकाराचीच छेड काढल्यामुळे महिला रात्री किती सुरक्षित आहेत, ते या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे.
संबंधित महिला पत्रकार गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता ऑफिसवरुन घरी जात होती. त्याच वेळी कुर्ला रेल्वे स्थानकावर आरोपीनं तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. धाडस दाखवून महिला पत्रकारानं आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीवर 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनं पुन्हा एकदा लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here