भाजपच्या “त्या” जाहिराती बंद

0
1085

 मुंबई, दि. ९ – भाजपची ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’  या जाहिरातीची सर्वत्र खिल्ली उडवली जात असतानाच भाजपने आता ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या जाहिरांतीऐवजी नवीन जाहिरात दाखवली जाईल असे सांगितले जाते.

काँग्रेसच्या सर्वात पुढे महाराष्ट्र माझा या जाहिरातींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही जाहिरात सुरु केली होती. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्न, शेतक-यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर भाष्य करणा-या या जाहिरातींमध्ये शेवटी कुठे नेऊन ठेवसाय महाराष्ट्र माझा ? असा प्रश्न विचारला जायचा. मात्र या जाहिराती भाजपसाठी बुमरँग ठरत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या जाहिरातींमधून महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचे म्हटले होते. तर सोशल नेटवर्किंग साईट्सवरुनही या जाहिरातीची खिल्ली उडवली जात होती. तसेच अनेकांनी या जाहिरातींवर संताप व्यक्त केला होता.

अखेरीस मतदानाला आठवडा भराचा कालावधी असताना भाजपने ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आजपासूनच या जाहिराती बंद केल्या जाणार असून याऐवजी आता नवीन जाहिरात सुरु केली जाईल असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here