एनबीएचा केजरीवाल यांना इशारा

0
719

मिडिया विकावू असल्याचे आरोप माध्यमांवर करीत सत्ता आली तर मिडियाला तुरूंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याची न्यूज ब्रॉडकास्टर्स असोशिएशनने गंभीर दखल घेतली असून केजरीवालने आपली दमबाजी थांबविली नाही तर आम आदमी पार्टीच्या कार्यक्रमाचे कव्हरेजच्या बाबतीत पुनर्विचार करावा लागेल असा इशाराच एनबीएने दिला आहे.

एनबीए ने म्हटले आहे की,अऱविंद केजरीवाल यांनी इलेक्टॉनिक मिडियावर केलेले आरोप आक्षेपार्ह,निराधार आणि बेजबाबदारपणाचे आहेत.इलेक्टॉनिक माध्यमांना आपली जबाबदारी पूर्णबणे कळते.मिडिया आपले काम स्वतंत्रपणे ,जबाबदारीने आणि पारदर्शीपध्दतीने आणि संतुलितपणे आपले काम करीत आहे.
नागपूर येथील एका कार्यक्रमात केजरीवाल यांनी इलेक्टॉनिक मिडिया काही राजकीय पक्ष आणि कार्पोरेटच्या हाती विकला गेला असल्याचा आरोप केला होता.आपच्या अन्य नेत्यांनीही अरविद केजरीवाल यांची री ओढत माध्यमांवर हल्ले केले होते.
एनबीए देशातील बहुसंख्य मोठ्या वाहिन्यांचे प्रतिनिधीत्व करते.त्यामुळे एनबीएने जर काही कठोर भूमिका घेतली तर अरविंद केजरीवाल कंपूची मोठी अडचण होणार आहे.कारण प्रसिध्दी हा आपचा श्वास आहे.तो बंद झाला तर आपला जगणे मोठे कठिण होणार आहे.एखादी वाहिनी चुकीच्या पध्दतीने काम करीत असेल किंवा वाहिनीच्या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल तर असा कोणीही व्यक्ती एनबीएकडे त्याची तक्रार करू शकतो.
महाराष्ट्रातही पत्रकार हल्ला ाविरोधी कृती समितीने केजरीवाल यांनी माध्यमांवर गरळ ओकणे थांबविले नाही तर राज्याच्या प्रत्येक जिल्हयात पत्रकार आपच्या कार्यालयासमोर निदर्शनं करतील असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here