एक जबरदस्त बातमीः

0
762

आजच्या ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्रात पान आठवर एक बातमी छापून आली आहे. तीत जॅक डॅनियल या गोव्याच्या लेखकाने निषेध म्हणून २५ हजारांचा पुरस्कार परत केल्याचे नमूद केले आहे.
प्रत्यक्षात गोव्यात असा कोणताही लेखक नाही. पण मित्रांच्या सांगण्यानुसार या नावाची इतकीच महाग अशी दारू मात्र आहे. राज्य सरकारच्या पत्रकारांसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या समितीची सदस्य असणाऱ्या एका पत्रकाराची कुणीतरी गंमत केली आणि विकेट पडली!
वृत्तपत्रसृष्टीत बऱ्याच दिवसांनी असा अस्सल विनोद घडतो आहे! आम्ही सगळे तो एंजॉय करतो आहोत!
पुरस्कार परतीची लाट आली नसती तर आपण सारेच या विनोदाला मुकलो असतो.
(अधिक औत्सुक्य असणाऱ्यांनी मुंबई समाचार विकत घ्यावा. तेवढाच आमच्या धंद्याला हातभार..)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here