उदगीरच्या पत्रकारांची वृक्षारोपणाची चळवळ

0
1362

आता झाडाला नावं आपल्या लेकरांचे !


मी उदगीरकर …पत्रकारांची लोकचळवळ !


  • आपण दरररोज बदलते हवामान, वाढते तापमान, कमी होणारे पर्जन्यमान यामुळे चिंतीत आहोत. ग्लोबल वार्मिंगबद्दल आपण भरभरुन बोलतो, वाचतो, ऐकतो पण करीत काहीच नाही. आपल्या आजुबाजूला सहज पाहिले तर पर्यावरणाचा र्‍हास झपाट्याने सुरु आहे. दररोज हजारो झाडांची बेसुमार कत्तल सुरु आहे, पण त्याप्रमाणात वृक्षलागवडच केली जात नाही. शेतात गेले तर बसायला सावली देणारे व शहरात आले तर गाडी पार्क करायला एक झाड नाही, तरीही आपण बेफिकीरपणे झाडांची होणारी कत्तल पहात बसलो आहोत. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी, अशी आपली ठाम समजुत झाली आहे. ही समजुत दूर सारुन प्रत्यक्ष कृति करण्याची गरज आहे. फार तर सरकार वृक्षलागवड करेल पण त्यांचे संगोपन करणे आपली नैतिक जबाबदारी आहे.
  • यासाठी आम्ही सर्व पत्रकार एकत्र येवून एक अभिनव वृक्षलागवडीची चळवळ उभी करीत आहोत. शहरात वृक्षलागवड करीत असताना समाजातील प्रत्येक घराला व घटकाला सोबत घेवून ही चळवळ व्यापक व जिव्हाळ्याची व्हावी म्हणून हरित चळवळीत लागवड केलेल्या प्रत्येक झाडाला त्या घरातील मुलांचे नाव देणार आहोत. यामागची कल्पना अशी की घरातील प्रत्येकाला ते झाड आपले वाटावे. ते आपल्या उदासिनतेमुळे सुकून जावू नये, त्याची निगा व संगोपन आपल्या पोटच्या लेकरासारखे केले जावे आणि झाडं वाढावित आणि जगावीत ही अपेक्षा आहे. या अभियानात सामिल झालेल्या प्रत्येक कुटूंबाचा सहभाग पर्यावराणासाठी लाखमोलाचा राहणार आहे.
  • आम्ही सारे पत्रकार समाजाला सोबत घेवून शहरातील प्रत्येक मोकळ्या जागेत झाडे लावण्याचा संकल्प करीत आहोत.शहरातील प्रत्येक कुटूंबाचे एक झाड असलेच पाहीजे, हा ध्यास घेवून ही लोकचळवळ व्यापक करण्याचा संकल्प करीत आहोत. ‘माझं उदगीर-हरित उदगीर’ अभियानातील प्रत्येक झाडाची जबाबदारी व त्याचे हेल्थकार्ड प्रत्येक कुटूंबाच्या हवाली करण्यात येणार आहे. कारण वृक्षलागवड येणार्‍या पिढ्यांसाठी आवश्यक आहे. आपल्या अंगणातील झाड आपल्यालाच सावली आणि फळ देणार आहे, सोबतच पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे. ‘मी उदगीरकर’ या हरित चळवळीत सामिल होणार्‍या व्यक्ती, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था व कुटूंबाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या कल्पना व सुचना जरुर कळवा !

मी उदगीरकर अभियानात सामिल होण्यासाठी –
विनोद मिंचे : 9403558888,
सचिन शिवशेट्टे : 8208151326,
रोशन मुल्ला : 9921404888,
श्रीनिवास सोनी : 9421485971,
रविंद्र हसरगुंडे : 9850102202,
बिभीषण मद्देवाड : 9823160552,
विक्रम हलकीकर : 9403012041, प्रभुदास गायकवाड : 9146581100, माधव रोडगे : 9673799946
यांच्याशी संपर्क साधावा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here