आता सोमवार 2 फेब्रुवारी…

  0
  710

  महाराष्ट्रातील आमदारांना कऱण्यात आलेल्या अवास्तव पेन्शनवाढीस विरोध कऱणाऱ्या आमच्या पीआयएलवर काला सुनावणी होऊ शकली नाही.आमची पीआयएल 20व्या क्रमांकावर होती.काल 15 व्या क्रमांकावर असलेल्या पीआयएलपर्यतच काम झाले.आता ही सुनावणी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी होत आहे.काल सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यत कोर्टात बसून वाट पाहण्यातच गेले.गेली दोन वर्षे नुसतीच प्रतिक्षा सुरूय.पण मला खात्रीय की, आम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल.गरज नसलेल्या माजी आमदारांच्या खिश्यात जाणारे 30 कोटी रूपये वाचले तर ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची मोठी बचत होईल. ज्या राज्यावर 3 लाख कोटी रूपयाचे कर्ज आहे आणी आणि त्यावरचे 24 हजार कोटीचे व्याज भरायलाही ज्या राज्याजवळ दमडी नाही त्या राज्यासाठी 30 कोटी ही रक्कम नक्कीच मोठी आहे.आपल्या सर्वांच्या बळावर ,पाठिब्यावर आणि आमचे वकिल प्रदीप पाटील यांच्या मदतीने ही लढाई सुरू आहे..काल दिवसभर सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी माझ्याबरोबरच दिवसभर ताडकळत बसले होते.त्या सर्वांचाही मी मनःपूर्वक आभारी आहे…

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here