आणखी एक महिला पत्रकार सामुहिक अत्याचाराची शिकार

0
766

महिला पत्रकार समाजकंटकांचे सध्या लक्ष्य ठरत आहेत असं दिसतंय.ताजी घटना आहे युपीतील.उत्तराखंडमधील एका महिला पत्रकारावर मिर्जापूर येथे सामुहिक अत्याचार केले गेले.बातमीच्या कव्हरेजसाठी आलेल्या महिला पत्रकारास काही लोकांनी गेरूआ तलावाजवळ जबरदस्तीने स्कॉर्पिओत बसविले आणि गाडी जंगलात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.बुधवारी ही घटना घडली.पोलिसांनी संबंधित तरूणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलंय.

रिपोर्टिंगसाठी आलेली ही महिला पत्रकार एका हॉटेलात उतरली होती.पोलिसांना या महिला पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार ती अष्टभुजा मदिराच्या दर्शनासाठी एकटीच गेली होती.दर्शन घेऊन येताना ऍटो न मिळाल्याने पायीच येत होती.त्यामुळे पत्रकार महिलेने स्कॉर्पिओला लिप्ट मागितली.गाडी थांबली.त्यांनी तरूणीला गाडीत बसविले आणि गाडी जंगलात नेली गेली.बलात्कार केल्यानंतर महिला पत्रकारास रस्त्याच्या कडेला सोडले,आणि आरोपी फरार झाले.नंतर पत्रकार महिलेने अष्टभूजा चौकी पोलिसात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here