वाहिन्याच्या झगमगणाऱ्या पडद्यामागची दुनिया तेवढी काळीकुट्ट आणि विखारी आहे.या काळ्या दुनियेचं सत्य सागणाऱ्या कथा सातत्यानं समोर येत आहेत.ताजी घटना आहे,हरियाणातील आय व्हिटनेस या चॅनलमधील.या चॅनलमधील प्रोग्रॅम हेड संदीपने आपली छेड काढली,त्रास दिला अशी तक्रार याच चॅनलमधील एच आर हेड महिलेनं सुशांत लोक पोलिस ठाण्यात केलीय.संदीपने आता या चॅनलचा राजीनामा दिलाय..याची बातमी स्थानिक वृत्तपत्रामध्येही प्रसिध्द झाली आहे.
आय व्हिटनेसमधील महिलेस त्रास दिला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापुर्वी एका ऍन्कर महिलेने छायाचित्रकारावर छेडछाडीचा आरोप केला होता.