अस्वस्थ आहे…

0
816

अस्वस्थ आहे…

सकाळी उठलो तर रूपेश गेल्याची बातमी अंगावर येऊन आदळली
दुपारी पैठणहून मित्राचा फोन आला
एका पत्रकाराला पोलिसानेच भरचौकात अर्वाच्च शिविगाळ केल्याची बातमी सांगितली,
चारच्या सुमारास मुंबईत दोन पत्रकारांना मारहाण झाल्याचं कळलं
या सार्‍या घटनांनी दिवसभर अस्वस्थ होतो.
काय करावं कळत नाही ?
सनदशीर मार्गानं आंदोलन करतो आहोत तर सरकार दखल घेत नाही.
एका मित्रानं सुचवलं,तृप्ती देसाईच्या मार्गानं जावं लागेल.
गावातील सर्व पत्रकारांनी एकत्र यायचं आणि भरचौकात हल्लेखोरांना चोप द्यायचा.
तेही शक्य होईलसं वाटत नाही.
कारण पत्रकारांवरचे हल्ले नियोजित असतात,
हल्लेखोर बनेल आणि गावातील टगे असतात
गुंड, बाहुबली असतात,राजकारणी असतात.
फिजिकली आपण त्यांच्याशी चार हात करू शकू ?
नक्कीच नाही
शिवाय हा मार्ग बहुसंख्य पत्रकार मित्रांना मान्य होणारा नाही
मग काय करायचं ?
परत एकदा मोर्चे काढायचे,15 ऑगस्ट काळा दिवस म्हणून पाळायचा,
सर्व पालकमंत्र्यांवर बहिष्कार टाकायचा की आणखी काही..?.
आपल्याला काय वाटतं…?
काही तरी ठोस करावं लागणार हे नक्की..
काय करायचं ?
आपली मतं कळवा..
एस. एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here