पत्रकारांच्या एकजुटीचा विजय
अविनाश बारगळ सक्तीच्या रजेवर

नाशिक येथील पत्रकार महेंद्र महाजन शेतकर्‍यांच्या आंदोलनाचं रिपोर्टींग करीत असताना पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी त्यांना बेदम मारहाण केली.महाजन यांना रूग्णालयात दाखल करावं लागलं.खाकी वर्दीच्या या अरेरावीच्या विरोधात नाशिकमधील सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटना सर्व भेद विसरून एकत्र आले.रस्त्यावर उतरले.झालेल्या प्रकाराच्या विरोधात आवज उठविला.अखेर आता सरकारला नमतं घ्यावं लागलं.अविनाश बारगळ यांना आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं आहे.नाशिकचे पोलिस आयुक्त एस.जगन्नाथन यांनी आज विविध दैनिकांच्या संपादकांची बैठक घेतली.त्यावेळेस त्यांनी ही माहिती घेतली.घटनेची चौकशी होईपर्यंत बारगळ रजेवर असतील.पत्रकारांच्या दबावापुढे व्यवस्थेला अखेर झुकावे लागले.यातून एक चांगला संदेश जाणार आहे.पत्रकारावर हात उचलताना यापुढे पोलिसांना चारदा विचार करावा लागणार आहे.नाशिक मधील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आम्ही सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मात्र बारगळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा ही आमची मागणी आहे.–

LEAVE A REPLY