उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूरमधील पत्रकार गजेंद्रसिंह यांच्या अंगावर मंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पेट्रोल अोतून त्यांना जाळले.या घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी मंत्र्याला अद्याप अटक झालेली नाही.या विषयावर जगभरातील माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया येत असल्यातरी आपल्या देशात जेवढ्या तीव्रपणे आणि आक्रमक पध्दतीनं या घटनेचा निषेध व्हायला हवा होता तो होताना दिसत नाही.माध्यमं देखील गप्प आहेत.अशा स्थितीत टाइम्स नाऊ वर अर्णब गोस्वामी यांनी आज शो करून हा प्रश्न जगासमोर आणला.त्यांनी केवळ विषयच मांडला नाही तर अारोपी मंत्र्याला अटक होईपयर्त या घटनेचा देशातील माध्यमं पाठपुरावा करतील असे आश्वासन दिले आहे.आम्ही अर्णब गोस्वामी यांना धन्यवाद देतो.कारण युपीतील एका दुरच्या शङरात राहणाऱ्या एका सामांन्य पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेत टाइम्स नाऊनं तमाम पत्रकारांना दिलासा दिला आहे.पत्रकार शहरात राहणारे,मोठ्या माध्यमांसाठी काम करणारे असोत किंवा दूरच्या खेडयात आणि छोटया वृत्तपत्रांसाठी काम करणारे असोत आम्ही सारे एक आहोत आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र येत आवाज उठवत राहणार आहोत हा संदेश टाइम्स नाऊच्या कायक्रमाने दिला गेला आहे.