वडवणीत नाही “पाणी” तरीही…

0
895

पाऊस उत्तम झालेला नाही,नद्या,नाले भरून वहात आहेत,शेतातील पिकं तरतरूण आलेली आहेत,कापूस,बाजरी,तुरीची पिकं तरारली आहेत,शेतकरी आनंदात आहेत,कशाची ददात नाही,हे वणर्न एखादया कवितेतलं किंवा स्वप्नातलं नाही.बीड जिल्हयातील सरकारी अधिकाऱ्यांना बीड,वडवणी,अंबाजोगाई तालुक्यात अशी स्थिती आहे असं वाटतंय.केवळ वाटतंय एवढंच नव्हे तर त्यांनी कागदोपत्री सरकारला तसं कळविलं आहे,त्यामुळं बीड,वडवणी आणि अंबाजोगाई हे तीन तालुके टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहेत.बीड जिल्हयात अकरा तालुके आहेत.त्यातील अाष्टी,पाटोदा,गेवराई,माजलगाव,धारूर,परळी,केज आणि शिरूर कासार हे आठ तालुके टंचाईग्रस्त असल्याचे जाहीर कऱण्यात आलं आहेत,या आठ तालुक्यात दुष्काळ आहे पण बीड,वडवणी,आणि अंबाजोगाईत आरं काही आबादी-आबाद असल्याचा अहवाल सरकारी अधिकाऱ्यांनी पाठविला आणि हे तीन तालुके टंचाईग्रस्त यादीतून वगळले.५० टक्के पेक्षा कमी पजर्न्यमान झाल्यामुळे राज्य सरकारने १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर केले आहेत.त्यात मराठवाडयातील बहुतेक तालुक्याचंा समावेश आहे.जे तालुके टंचाईग्रस्त जाहीर झाले आहेत तेथील शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळणार आहे,शेतसारा माफ होणार आहे,पाल्यांच्या शाळा काॅलेजच्या शुल्क माफी आदि सवलती मिळणार आहेत.मात्र आता वडवणी,अंबाजोगाई आणि बीड तालुके यापासून वंचित राहणार आहेत.वस्तुस्थिती अशी आहे की,बीड जिल्हयातील अन्य तालुक्यांची जी स्थिती आहे तीच टंचाईग्रस्त म्धून वगळलेल्या तीन तालुक्यांची आह.बीड जिल्हयात अगोदरच ५०० मिली मिटरच्या आसपास पाऊस पडतो.यंदा त्याच्या पन्नास टक्के देखील पाऊस झालेला नसल्यानं परिश्थिती गंभीरच आहे.वडवणी तालुकयाचा मोठा भाग डोंगराळ आहे.तिथं पाऊस पडला तरी पाणी वाहून जाते.त्यामुळे हा सारा परिसर कायम दुष्काळी आणि रखरखीत आहे.उस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या वडवणी तालुक्यातच अधिक आहे.यंदाही पिकांची स्थिती ७५ टक्के भागात चांगली नाही.ज्या २५ टक्के भागात पिंकं बरी आहेत तिथंही गेला महिनाभर पाऊस नसल्यानं ही पिकं माना टाकायला लागली आहेत.अनेक गावात पाणी टंचाईही आहे.असे असतानाही जर सरकार आबादी-आबाद आहे असं म्हणत असेल तर सरकारचा आणि सरकारी अधिकाऱ्यांचा हेतू शूध्द नाही असंच म्हणावं लागेल.या विरोधात आता तालुक्यातील शेतकऱ्यांनीच आता रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करावा लागेल.या विरोधात लगेच आवाज उठविला गेला नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.वडवणी येथील पत्रकार अनिल वाघमारे यांनी ही वस्तुस्थिती जनतेच्या निदशर्नास आणून दिली आहे.आता राजकीय पक्षांनी याविरोधात रस्त्यावर उतरून वडवणी तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे.विद्यमान आमदार प्रकाश सोलंके यांनी महसूल मंत्र्यांना निवेदन देतो असं सांगितलं अाहे.ते ठीक आहे पण संवेदना हरवून बसलेले सरकार निवेदनाला दाद देईल असं वाटत नाही.त्यासाठी जनमताचा रेटाच आवश्यक आहे.ती तयारी आता जनतेनं केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here