अजब सरकारी पत्रिका

    0
    1235

    ही मराठी जाहिरात ज्या कुणी मंजूर केली त्याला हुतात्मा चौकात 100 फटके दिले पाहिजेत.
    जाहिरातीत अपूर्व हिरे हे नाव *अपूर्वा हिरे*,
    देवयानी फरांदे हे नाव *देव्याणी फरांदे*,
    पंकज भुजबळ लिहिणाऱ्याने
    छगन भुजबळ हे नाव *छगन भूजबळ*,
    आमदार *पाडवी ऐवजी पदवी*
    अशी वाटेल तशी नावे लिहली तर आहेतच. पण, *याशिवाय आणखी एक गंभीरबाब* आहे.
    रक्षाताई खडसे यांच्या नावापुढे सौ. लिहून ठेवले आहे. महिलांचा सार्वजनिक उल्लेख त्यांनी स्वतःहून न सांगितल्यास सरसकट श्रीमती असा करावा असा सरकारी संकेत असताना कशाला कुणाच्या नावामागे सौ. लावायचे? ते सुद्धा रक्षा खडसे यांच्या नावापुढे? हा जखमेची खपली काढायचा प्रकार झाला. कारण, *इतर 10 महिला लोकप्रतिनिधींच्या नावाआधी श्रीमती लिहिले असताना फक्त रक्षा खडसे यांच्या नावापुढे सौ. लिहायची कंड कुणाच्या हाताला आलीय* हे समजलेच पाहिजे?

    प्रसाद काथे यांच्या वॉलवरून

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here