अग्रलेखाची जागा सोडली कोरी..

0
918

वृत्तपत्र स्वातंत्र्याची जेव्हा जेव्हा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशातील माध्यमांनी एकत्र येत सनदशीर मार्गांनी त्याला विरोध केला.आणीबाणी असेल किंवा बिहारचा काळा कायदा जेव्हा पारित झाला तेव्हा असेल माध्यमांनी आपली अग्रलेखाची जागा कोरी ठेऊन किंवा पहिल्या पानावरचा पहिला कॉलम काळा करून आपला संताप व्यक्त केला.त्रिपुरात मंगळवारी सुदीप दत्ता या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्त्या केली गेली या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी त्रिपुरातील बहुतेक दैनिकांनी आपली अग्रलेखाची जागा कोरी ठेऊन आपला संताप व्यक्त केला.या सार्‍याचा असंवेदनशील व्यवस्थेवर कितपत परिणाम होईल माहिती नाही पण हा निषेध प्रभावी नक्कीच आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here