अकोल्यात दोन पत्रकारांवर हल्ले

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत
कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

अकोला – १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकोला शहरातील राऊतवाडी परिसरात दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले आजतकचे मीडिया प्रतिनिधी धनंजय साबळे व सिटी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अकबर खान पठाण यांना वृत्तसंकलन करतेवेळी श्रवण सूर्यवंशी याने अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आरोपी सध्या फरार असून या आरोपीला त्वरित अटक करून आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीकरिता अकोला जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यात आली

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या घटनेबाबत पोलीस प्रशासन गंभीर असून लवकरच गुन्हेगाराला अटक करून जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीच्या मागणीनुसार पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया लवकरच तपासाअंती घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केले.समाज माध्यमात काम करताना पत्रकारांची असे प्रकार घडू नये याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिली

यावेळी शौकतअली मिरसाहेब,अजय डांगे, सुधाकर खूमकर,विवेक राऊत,अनिल माहोरे,विठ्ठलमामा वाघ, प्रमोद लाजूरकर, पद्माकर आखरे, प्रकाश भंडारी,राजेंद्र काकडे,उमेश अलोने, जयेश जगड, जयेश गावंडे,विशाल बोरे,जयप्रकाश मिश्रा, दीपक गवई, प्रदीप काळपांडे,इमरान खान, संजय चक्रनारायण, अक्षय गवळी, सुरेश राठोड़,कुंदन जाधव दीपक शर्मा,बंटी नंदूरकर, निलेश धाड़ीकर, आसिफ खान, शरद शेगोकार, इमरान खान, हमीद रहमान, गणेश सूरजुसे, सईद भाई, विजय देशमुख अनुराग अभंग, सुनील सावरकर, नरेंद्र शर्मा, इमरान खान, ज्ञानेश्वर निखाळे,संजय थातुरकर, नरेंद्र देशमुख आदी,पत्रकार यावेळी उपस्थित होते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here