अंदमानातही सावरकरांची ऊपेक्षा ——————-

0
2035

सफर अंदमानची   

चेन्नई येथून दोन तासांचा प्रवास करून आमचं विमान पोर्टब्लेअरच्या विमान तळावर “लॅंन्ड’ झालं तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते.ऊन्हाळा अजून सुरू  व्हायचा होता,तरीही अंगाला चटके बसतील एवढं कडक ऊन होतं.रायगड प्रेस क्बच्या टोप्या आम्ही बाहेर काढून डोक्यावर चढविल्या,आणि हातातील वर्तमानपत्राच्या सहाय्याने ऊन्हापासून स्वत:चं रक्षण करीत धावपट्टीवरून विमानतळाच्या दिशेने निघालो .तेवढ्यात मिलींद अष्टीवकरांनी समोर दिसणाऱ्या बोर्डाकडं आमचं लक्ष वेधलं, “वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’  अक्षरं वाचून आमच्या अंगावर रोमांच ऊभे राहिले आणि सावरकरांच्या पवित्र भूमित आपण असल्याची सुखद जाणिव झाली.लोकांना काय़ वाटेल याची पर्वा न करता मी जमिनीवर डोकं ठेवून सावरकरांना अभिवादन केलं.माझे सहकारी आणि विमानातून आमच्या बरोबर ऊतरलेल्या काही मराठी कुटूंबही अशीच भाराऊन गेली होती. सावरकर अभिवादन यात्रेच्या निमित्तानं मराठी माणसांची चांगलीच ऊपस्थिती सर्वत्र जाणवत होती. त्यामुळंच आपण अंदमानात आहोत की अलिबागला असा प्रश्नही पडत होता.अंदमानचा नयनरम्य निसर्ग पाहण्यापेक्षा बहुतेकजण सावरकरांच्या दर्शनासाठीच आल्याचे दिसत होते आणि सारेच  ते स्पष्टपणे मान्यही करीत होते.सावरकर अभिवादन हा आमच्याही अंदमान भेटीचा ऊद्देश होता,म्हणूनच आम्ही सारेच सावरकरांना आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची दहा वर्षे ज्या कुप्रसिध्द सेल्युलर जेलमध्ये घालवावी लागली त्या सेल्यूलर जेलला भेट ध्यायला आणि सावरकरांना ज्या काळकोठडीत ठेवले होते त्या कोठडीचे दर्शन घ्यायला अधिर झालो होतो.त्यामुळे विमान तळावरील सारे सोपस्कार आटोपून आम्ही आमच्या नियोजित ़ठिकाणी पोहोचलो.सेल्यूलर जेलचे दरवाजे पाचच्या ठोक्याला बंद होतात हे आम्हाला माहित नसल्याने आंघोळी आणि जेवणं आटोपून सेल्यूलर जेलजवऴ पोहचलो तेव्हा साडेचार वाजले होते.अंदमान आपल्यापेक्षा एक तास पुढे आहे.पाच-साडेपाचलाच तेथे दिवस मावळतो.मावळतीकडे निघालेल्या सूर्याची कोवऴी ऊन्हं साडेचारलाच सेल्यूलर जेलच्या ईमारतीवर पडली होती .पिवळ्या धमक रंगाची ही ईमारत सोनेरी सूर्यकिरणांनी अधिकच ऊठून दिसत होती.दर्शनी भागावरून ईमारतीच्या आतील भागाच्या भव्यतेची कल्पना येत नाही. आत गेल्यावर मात्र “काळे पाणी’ काय असू शकते याची कल्पना येऊ शकते.आम्हाला पोहचायला थोडा ऊशीर झाल्याने तेथील कर्मचा़ऱ्यांची आवरा- आवर सुरू झाली होती.अनेकदा मिनतवारी करूनही  वेळ संपल्याचे सांगत तिकीट काही दिले गेले नाही.अर्थातच आम्ही नाराज झालो,थोडे संतापलो देखिल.प्रत्येक ठिकाणी पुरातत्व विभाग अशी संवेदनहिन कर्मचारी का नेमतो याचे कोडे मला नेहमीच पडत असे.अंदमानातही तेच दिसले.सरळ मार्गाने तिकीट मिळत नाही आणि आम्हीं तर  जेल पाहण्यासाठी ऊताविळ झालेलो.आमच्या बरोबर असलेल्या धरत यांनी एजन्टामार्फ़त गेटकिपरला गाठले आणि मागच्या दाराने आत जाण्याची व्यवस्था केली.  धावत पऴत आम्ही गाईडला गाठले.सारा तुरूंग आम्हाला आजच बघायचा नव्हता .सावरकरांची कोठडी आम्हाला पहायची होती. तिथे जावून सावरकरांना अभिवादन करायचे होते.गाईडने बोटानेच तिकडे जा ची खूण केली.प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर ऊजव्याबाजूला असलेल्या ईमारतीत तिसऱ्या मजल्यावर सावरकरांची खोली आहे.ती दुरूनच दिसते पण तिथपर्यत पोहोचणे सोपं नाही.कारण तुरूंगाची रचनाच तशी आहे . सेल्यूलरची निर्मिती अत्यंत कुशलतेने केली आहे हे नाकारता येणार नाही.सायकलच्या ताराप्रमाणे सात दिशेकडे तीन मजली जेलचे भाग पसरले आहेत.पण सातही भाग एका ठिकाणी जुळविले गेले आहेत.त्यामुळे एक पहारेकरीही सातही भागावर लक्ष ठे़वू शकत असे.सात भागात मिळून ६९८ खोल्या आहेत.प्रत्येक भागाच्या सुरूवातीच्या भागाला म्ह़णजे प्रवेशव्दारावर भक्कम असे लोखंडी दार दिसते.कठड्याचा भागही लोखंडी गजांनी बंद केलेला आहे.कोठडीची कुलूप व्यवस्थाही कमालीची मजबूत आहे.ईमारतीची रचनाच अशीआहे की,कुठल्याही परिस्थितीत एक कैदी दुसऱ्या कैद्याशी संपर्क साधू शकत नव्हता.त्यामुळेच सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर त्याच तुरूंगात असतानाही कित्येक दिवस सावरकरांना त्याची कल्पना नव्हती .गाईडने सांगितलेल्या दिशेने आम्ही पळत सुटलो .तिस-या मजल्यावर पोहचल्यावर डाव्या बाजूला असलेल्या बराकीत सरळ रेषेत चालत गेल्यावर शेवटची खोली विनायक दामोदर सावरकर यांची आहे.साडेतेरा फ़ूट लांब,सात फूट रूंद,आणि नऊ फूट ऊंच असा खोलीचा आकार आहे.हवेसाठी ऊंचीवर तीन फूट लांब,एक फूट रूंदीची खिडकी आहे.पण त्याचा काही ऊपयोग नव्हता.कारण सूर्याची किरणही तिथं येत नव्हती. ईतर कैद्यांच्या खोल्यांना एकच भक्कम लोखंडी दरवाजा आहे.सावरकर हे इंग्रजांच्या लेखी ” खतरनाक’ आरोपी असल्याने त्यांच्या खोलीला एक भक्कम दरवाजा आणि खोली समोरच्या रिकाम्या जागेत पुन्हा एक दरवाजा आहे.या खोलीत  सावरकरांनी  दहा वर्षे काढली.आम्ही खोलीजवळ पोहोचलो तेव्हा तेथे बऱ्य़ापैकी गर्दी होती.मराठी कु टूंबुुुुंच होती बहुतेक.सारेच  कमालीचे भाऊक झालेले.सावरकरांबद्दलची भक्ती आणि श्रध्दा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.अनेकजण नतमस्तक होत होते.आम्ही  पादत्राणे बाहेर काढली.दरवाज्यावर डोके ठेवले आ़णि आत प्रवेश केला.खोलीत स्वच्छता वगैरे होती पण सावरकरांनी देशासाठी जो सर्वैच्च त्याग केला त्याची कोणतीच आठवण भारत सरकारला आहे असे खोलीत प्रवेश केल्यावर दिसले नाही.एक छोटासाच आणि कळकट झालेला ़फ़ोटो तेथे भिंतीवर लटकताना दिसतो आहे.पन्नास वर्षाची झालेली जन्मठेप,काळ कोठडीतून सुटण्याचे को़णतीच शक्यता नाही,म्हणजे अंध:कारमय भविष्य आणि कोलू ओढून-ओढून रापलेले हात आणि मन अशा मन:स्थितीतही सावरकरांनी आपले कवीमन जिवंत ठेवले होते.त्यामुळेच ते काळकोठडीतही जयस्तूते सारखे अजरामर महाकाव्य लिहू शकले. कागद नाही,पेन नाही,तरीही त्यांनी भितीतांच कागद केला आणि खिळ्याची लेख़णी करून लेखन केले.सावरकराचे मन काळकोठडीत भारताच्या स्वातंत्र्याच्या योजना आखत होते.सभोलताच्या नैराश्याच्या वातावरणात अनेकांचे हातपाय गारठून जात असताना आणि डोके काम करीत नसताना सावरकर मातृभूमी बंधमुक्त करण्याच्या योजना आखत होते.हे धैर्य केवळ महापुरू षच दाखवू शकतो.संतापाची गोष्ट अशी की,सावरकरांच्या बलीदानाचा ,त्यागाचा सन्मान सरकारने केला नाही , हे अंदमानात ऊतरल्यापासून पदोपदी जाणवत होते.सावरकरांच्या खोलीत सावरकरांचे भव्य चित्र सरकारला लावता आले नाही ,किंवा त्यांच्या महाकाव्याच्या आळीही भितीवर कोरता आल्या नाहीत.आम्ही सारेच संतापलो होतो.तेथील ऊपस्थित अधिकाऱ्यास विचारले,आम्ही सावरकरांचा फोटो भेट देतो तो त्यांच्या खोलीत लावाल काय़? अधिकाऱ्याचे ऊत्तर होते,सरकारला विचारावे लागेल.सावरकरांचीच अशी ऊपेक्षा आहे म्हटल्यावर ईतर राजकीय कैद्यांबद्दल काय बोलावे? कोणत्याच खोलीत कोणाचा फोटो दिसला नाही.ऊ द्विग्न होऊनच आम्ही बाहेर पडलो.पुन्हा फाशी घरासमोरच्या मैदानात आलो .तिथं ध्वनी आ़णि प्रकाश योजना कार्यक्रमाची तयारी सुरू होती.हा कार्यक्रमही आम्हाला बघायचा होता.तासाभराचा हा कार्यक्रम बघितल्यानंतरही फारच निऱाशा झाली.तासाभराच्या कार्यक्रमात सावरकरांच्या कर्तृत्वाचा ऊल्लेख अभावानेच आलेला आहे.अंदमान- निकोबार केद्रशासित प्रदेश असल्याने ईथं केद्राची सत्ता चालते.केद्रात कॉंग्रेसचे सरकार आहे आणि या सरकारला सावरकरांबद्दल तिरस्काराची भावना आहे हे जगजाहीर असले तरी सावरकरांच्या त्यागाचा अशा प्रकारे ऊपमर्द करणे योग्य नाही.स्क्रिप्ट ज्याने कोणी लिहिली असेल त्याने सावरकरांवर अन्यायच केला आहे.

बाबाराव सावरकरांनी एका ठिकाणा म्हटले आहे की.

हे तीर्थ महातीर्थांचे आहे,याला काळे पा़णी म्ह़णू नका,

आ़पण या भूमीच्या कणा-कणातून,बलीदानाची कथा ऐका

अंदमानातील प्रत्येक वास्तू मधून बलीदानाची कथा नक्कीच ऐकायला मिळते पण” लाईट अँन्ड म्युझिक शा’े मात्र पार निराशा करतो. कार्यक्रमातून जे कथानक ऊलगडत जाते ते ऐकून ना कानशिला तापतात,ना अंगावर रोमांच ऊभे राहतात ना आश्रूनी डोळे डबडबून येतात. एका तासात घटनांचा आलेख मांडला गेला आहे. तो मांडतानाही सावरकरांवर अन्याय केला गेला आहे    का्रतीविरांचा आणि जेलर डेविड बेरीचा संवाद कसा  डोकं तापविणारा असायला हवा पण तसं काहीच होत नाही.पुण्याच्या शनिवार वाड्यातील असाच शो किती तरी चांगला आणि बराच वास्तववादी आहे.शो कसा हवा तर तेथील तो ऐतिहासिक पिंपळ,भितींना जिवंत करणारा आणि त्यांना बोलायला ला़वणारा असायला हवा होता.तसे होत नाही त्यामु़ऴेच अनेकाना शो कधी संपतो त्याची प्रतिक्षा लागलेली असते.लाईट अँन्ड म्यझिक ़शो ची नव्याने स्क्रीप्ट तयार केली पाहिजे असेच मला वाटते.

आणखी एक धक्का

          ————

 शो पाहून मरगळलेले चेहरे घेऊन सेल्यलर जेलच्या बाहेर आलोत तर आणखी एक धक्का बसला.संपूर्ण अंदमानात सावरकरांचा असा भव्य-दिव्य पूतळा कोठेच नाही.अंदमानात महात्मा गांधींचा पुतळा आहे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आहे,विवेकानंदांचा आहे आणि भर समुद्रात राजीव गांधींचाही भव्य पुतळा आहे.हा पुतळा कशासाठी याचे कोडे ऊलगडत नाही तरीही त्यास विरोध करण्याचे कारण नाही पण सावरकरांच्या वाट्याला राजीव गांधी सारखे भाग्य आले नाही याची खंत मात्र वाटते.कारण सेल्युलर जेल समोर अगदीच छोटा म्हणजे जेम-तेम दोन-अडिच फूटाचा सावरकरांचा पूत़ळा आहे.सावरकरांच्या भव्य पुतळ्यासाठी अंदमानात कोठेच जागा मिळू नये हे सरकारच्या कर्मदरिद्री़पणाचं लक्षण आहे असंच मला वाटतं.साऱ्या अंदमानात सावरकरांच्या नावाने मार्ग नाही.दुख:ची गोष्ट अशी की,सावरकरांच्या नावाची तेथे भिती केवळ सरकारलाच वाटते असे नाही तर मराठी लेखकही सावरकरांच्या नावाला घाबरतात की काय अशी शंका ध्यावी अशीच स्थिती तेथे आहे.बबन फाले नावाचे एक मराठी लेखक भेटले .त्यांनी अंदमानवर काही पुस्तकं लिहिली आहेत.हे गृहस्थ आपल्या नागपूरचे.तेथे गेली २५ वर्षे वास्तव्य करून आहेत.अंदमानच्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या ऊभारणीत माझा मोठा वाटा  आहे असे त्यांनीच आम्हाला सांगितले.त्यांनी त्यांची 5-6 पुस्तकं आम्हाला दाखविली एकाही पुस्तकावर सावरकरांचे कव्हर नव्हते.ऊलटपक्षी पोर्टब्लेअरवर त्यानी जे पुस्तक लिहिले आहे ,त्या कव्हरवर सेल्यूलर जेलच्या पार्श्वभूमीवर नेताजीचा फोटो पाहून मला आश्चर्यच वाटले.वस्तूत: नेताजी सुभाषचंद्रांचा मी भक्त ईआहे.स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींचे योगदान अन्य कोणापेक्षाही कमी नव्हते किंबहूना ते कांकणभर जास्तच होते.कॉंग्रेस आहे.कॉंग्रेस  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महात्मा गांधींनी त्यांच्यावर घोर अन्यायच केल्याची माझी ठाम समजूत आहे.हे सारे खरे असले तरी पोर्टब्लेअरच्या पुस्तकावर नेताजींचा फोटो अप्रस्तुत वाटतो.कारण २९  डिसेंबर १९४३ ला नेताजी अंदमानला आले होते आणि ते तेथे केवळ तीन दिवसत तेथे थांबले होते.या भेटीत त्यांनी सेल्यूलरची पाहणी केली होती.सावरकरांचे सेल्यूलर मधील वास्तव्य जवळपास १० वर्षांचे होते या पार्श्वभूमीवर किमान एका मराठी माणसाच्या पुस्तकावर तरी सावरकराचे छायाचित्र हवे होते.आमची ही खंत आम्ही संबधित लेखकाला बोलून दाखविली .त्यांनीही त्यांची चूक मान्य के ली मात्र अंदमानमधील बंगाली लॅाबीच्या भितीने त्यांनी असे केल्याचे त्यांनीच अप्रत्यक्षरित्या मान्य केले.अंदमानात मराठी माणसं नाहीत पण  लोकसंख्येत बंगालींची संख्या मोठी आहे.त्यांचा तेथे प्रभाव आणि बऱ्यापैकी दबदबा आहे.थोडक्यात सावरकरांची सर्वथरावर ऊपेक्षा सुरू असल्याचे दिसले.मी काही सावरकरवादी नाही.पण सावरकर कुटूंबीयांनी देशासाठी जो त्याग केला,ज्या यातना भोगल्या त्याची ऊपेक्षा करण्याएवढा मी कृतघ्नही नाही.सावरकरांचे विचार सर्वांना मान्य होणार  नसतीलही पण त्यामुळे त्यांच्या स्वातत्र्य लढ्यातील योगदानाचे महत्व कमी होत नाही. म्ह़णूनच त्यांच्या योगदानाची  उपेक्षा करणे त्यांच्यावर घोर अन्याय करणारे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.वस्तुत: अंदमानला सावरकर नगरी  आणि ईतर बेटांना सेल्यूलरमधील ईतर देशभक्ताची नावे दिली तर ते अधिक ऊचित होईल .नेताजी जेव्हा अंदमानला आले होते तेव्हा त्यांनी अंदमानला “शहीद नगर’ आणि निकोबारला “स्वराज नगर’ अशी नावं सूचविली होती.त्याची कोणी दखल घेतली नाही.अंदमान व्दीपसमुहावर मानवी वस्ती करण्याचा निर्णय झाला तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड कार्नवालीसने सर्वेक्षणासाठी लेफ्टिनंट आर्चिबाल्ड ब्लेअर आणि लेफ्टिनंट कोलब्रुक यांना अंदमानला पाठविले होते.त्यामुळे व्दीपाची राजधानी असलेल्या ठिकाणाला  ब्लेअरचे नाव दिले गेले.पोर्टब्लेअरवर १७८९ ला  चाथम ईथे पहिली कैदी वसाहत स्थापन केली गेली त्याला आता सव्वा दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे.दरम्यानच्या काळात इंग्रजांची राजवटही संपुष्टात आली .त्यामुळे व्दीपसमुहातील बेटांना इंग्रजानीच दिलेली आणि इंग्रजांचीच नावं ठे़़़वण्याची कोणतीच गरज नाही.काही बेटांवर फिरताना हे सारे प्रकर्षाने जाणवते.काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सर्वच स्वातंत्र्य सैनिकांची नावे जर व्दीपसमुहातील बेटांना दिली तर ते स्वातंत्र्य विरांचे खरे स्मारक होईल व्दीपसमुहातील ८२४९ वर्ग किलो मीटर क्षेत्रात ५५६ लहान मोठी बेटं   होईल असे मला वाटते.व्दीपकल्पातील बेटांची संख्या ५५६ आहे याचा अर्थ सेल्युलरमधील सर्वच देशभक्तांची नावे त्यांच्या दर्जाप्रमाणे देणे शक्य आहे .त्याला कोणाचा विरोध होण्याचेही कारण नाही.हिंदूत्ववादी म्हणून सावरकरांचा ऊदोऊदो करणाऱ्या भाजपच्या राजवटीतही हे झाले नाही आणि एक मराठी माणूस अंदमानचा गव्हर्नर झाल्यानंतरही त्याने काहीच केले नाही.याचे कारण  इंग्रज गेले असले तरी आपली अजून मानसिक गुलामगिरीतून सुटका झालेली नसल्याने सरकार असा काही निर्णय घेत नाही.हे आपले दूर्दैव आहे दुसरे-तिसरे काही नाही.

 सुंदर अंदमान

 अंदमानात आम्ही दहा दिवस होतो.सारा अंदमान बघायचा असेल तर दहा दिवसही कमी पडतात.अंदमानात पाहण्यासारखी एवढी ठिकाणं आहेत की,दिवस कसे निघूृन जातात तेही समजत नाही. रॉस व्दीप ,वाईपर व्दीप,चाथम व्दीप,हॉम्फ्रीगंज शहिद स्मारक,हार्बर क्रुज,चिडियाघर,मरीना पार्क,रेड  स्कीन,जॉली बॉय,सिंक व्दीप,नॉर्थ बे बीच,चिडिया टापू,माऊंट हॅरियट,हैवलॉक व्दीप,नील व्दीप माया बंदर,दीगलीपूर,बैरन व्दीप,बाराटांग बेट,मड व्होल्कोनो,राधानगर येथील सुंदर बीच या सारखी अनेक ठिकाणं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी पोहचण्यासाठी किमान एक दिवस लागतोच लागतो.ही सारी ठिकाणं पर्यटकांना नक्कीच स्वर्गसुखाचा आनंद देणारी आहेत.केवळ सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलेही येथील निसर्गाच्या प्रेमात केव्हा पडतात हे त्यांनाही समजत नाही.वर उल्लेख केलेली छोटी -छोटी बेटं आहेत.बोटीतूनच हा प्रवास करावा लागतो.हा प्रवास आल्हाददायक आणि अविस्मरणीय असाच आहे.विस्तीर्ण बंगालचा उपसागर ,दूरवर दिसणारे व्दीपांचे पुंजके हे सारे दृश्य डोळ्यात न मानवणारे असेच आहे.अंदमानच्या समुद्राचे वैशिष्ट्य असे की,हा समुद्र कमालिचा स्वच्छ आणि सुंदर आहे.अनेक बोटींना खाली कचा बसविलेल्या आहेत .या कांचांमधून कित्येक ़फ़ूट खोलीचा समुद्राचा तळ आपणास दिसतो.त्यात बागडणाऱ्या जलचरांचे दर्शनही स्कुबा डायव्हींग न करताच आपणास होते.समुद्रत कुठेही कचरा अथवा प्लॅस्टीकचा तुकडाही दिसत नाही. काही ठिकाणी समुद्र निळाशार दिसतो तर काही ठिकाणी काळा दिसतो.विमानातूनही खाली पाहिले तर पाणी काळेच दिसते त्यामुळेच अंदमानला त्याकाळी काळे पाणी म्हटले गेले असावे.काळे पाणी या शब्दाला भयानकतेचाही एक अर्थ आहे.सावरकरांना अंदमानात ठेवले गेले होते तेव्हा हा परिसर भयानकच होता.ज्या पोर्टब्लेअरमध्ये सेल्युलर जेल आहे तो भाग आज शहरी समजला जात असला तरी कधी काळी हा परिसरही जंगलव्याप्तच होता. वर्षातले दहा महिने तेथे पाऊस पडायचा,मलेरिया,सरपटणाऱे प्राणी,जंगली श्वापदं,तसेच जंगली आदिवासींचा या पट्‌ट्यात सुळसुळाट असायचा हवाही दमट आणि रोगांना निमंत्रण देणारी.त्यांमुळे काळ्या पाण्यावर आलेला कैदी आपण परत आपल्या मातृभूमीला परत जावू याची आशाच सोडून ध्यायचा. कारण अंदमानच्या अवती भोवती शेक़डो किलो मीटरचा समुद्र पसरलेला  आहे.आजही अंदमानला बोटीतून जायचे असेल तर कलकत्ता किंवा चैन्नईवरून १२०० कि.मी.चे अंतर पार करायला तीन चार दिवस लागतात.विमानाने दोन ते अडीच तास लागतात.त्याकाळी आठ ते दहा दिवस सहज लागायचे.त्यामुळे पळून जाणे वगैरे विचारही कैद्यांच्या डोक्यात येत नसत.सेल्युलर जेलच्या चोहोबाजुंनी समुद्र असल्याने कोणी पळण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची अखेर ही पाण्यातच व्हायची .कारण हजारो कि.मी.चा समुद्र पार करून कलकत्ता गाठणे कोणालाच शक्य नसायचे.काळे पाणी याचा दुसरा अर्थ मृत्यूु असाच घेतला जायचा.अनेक कैदी अंदमानात येताच देह ठेवायचे.एकदा कैदा अंदमानात आला की त्याचा जगाशी संबंध संपायचा.आज अंदमान पूर्णतः बदलले आहे.ते आज महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे.दरवर्षी हजारो पर्यटक अंदमानला भेट देतात आणि आनंद मिळवितात.अंदमानात आज सारी साधनं ऊपलब्ध आहेत.सुख-सोयी आहेत.वाहतुकीची साधनं आहेत. मात्र अंदमानचे दारिद्‌÷य काही संपलेले नाही.गरिबी आणि दरिद्‌÷याच्या खुणा अंदमानात पदोपदी बघायला मिळतात.रोजगाराऱ्याच्या संधीही मर्यादित आहेत .पर्य़टनावरच अनेक कुटुंबं आपली ऊपजिविका करतात.परिणामतः पर्यटक विमान तळावर ऊतरल्यापासूनच अनेक एजन्ट त्याचा पिच्छा पुरवितात. अंदमान आणि निकोबार बेटाचे क्षेत्र हिमाल्य पर्वताचा एक भाग आहे.जो अराकनयोमा नावने ओळखला जातो.ही व्दीपांची माळ ऊत्तर पूर्व ते दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात चंद्र कोरी प्रमाणे पसरलेली आहे.या व्दीपाच्या दक्षिण पूर्वेला सुमात्रा देशाची सरहद्द लागलेली आहे.अंदमान आणि निकोबार व्दीपमाळेचे हे सारे व्दीप म्हणजे ५५६ लहान मोठया व्दीपांचा समुह आहे.अंदमान निकोबारमध्ये तीन जिल्हे आहेत.पहिला जिल्हा लिटिल अंदमान,दक्षिण अंदमान दुसरा जिल्हा ऊत्तर तथा मध्य अंदमान आणि तिसरा जिल्हा म्हणजे निकोबार.निकोबार जिल्ह्यात कारनिकोबार,ननकोरी,आणि ग्रेटनिकोबारचा समावेश होतो. पोर्टब्लेअर ही या व्दीपांची राजधानी आहे. व्दीपाचे क्षेत्रफऴ ८२४९ वर्ग किलो मीटर आहे.८६ टक्के क्षेत्रफऴ वनक्षेत्र आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे.अंदमानची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २४६४९  एवढी आहे.हा सारा प्रदेश केंद्रशासित आहे.अंदमान आणि निकोबार असा ़ऊल्लेख आपण करीत असलो तरी निकोबार अंदमानपासून बऱ्यापैकी दूर असल्याचे आणि तेथे जाण्यासाठी आठ-ऩऊ तासाचा बोटीचा प्रवास करावा लागतो असे आम्हास सांगण्यात आल्याने आम्ही निकोबारला गेलो नाहीत.२६ डिसेंबर २००४  रोजी आलेल्या सुनामीचा तडाखा अंदमानला कमी बसला असला तरी ग्रेट निकोबार बेटांना सुनामीचा चांगलाच तडाखा बसला असे आम्हास सांगण्यात आले.अंदमान- निकोबारचा शोध कसा लागला हा पर्यटकंाचा ऊत्सुकतेचा विषय असतो.नेग्रिटो वंशाच्या लोकांना ही बेटे प्रथम ज्ञात झाली असावित.प्राचिन अरब आ़िण भारतीय व्यापाऱ्यांच्या लिखानात याचा ऊल्लेख आढळतो.दुसऱ्या शतकात टॉलेमिने या बेटाचा ऊल्लेख विविधप्रकारचे शंखशिंपले मिळणारे बेट असा केला जायचा.त्यानंतर विविध प्रवास वर्णनातून ही बेटे आपणास भेटतात.अंदमान हे नाव हनुमान या नावावरून आणि निकोबार हे नाव तंजावर शिलालेखात ऊल्लेखलेल्या नेक्कामरम म्हणजे विवस्त्र लोकांची भूमी रूढ झाले असावे मानले जाते.१७ व्या शतकात युरोपीय लोकांचे लक्ष या बेटांकडे वेधले गेले.अंदमानच्या इतिहासाचे चार कालखंड पाडता येतील.१७८८ पर्यतचा चाच्यांच्या ऊपद्रवाचा कालखंड,१७८८ ते १९४१ ब्रिटीश राजवटीचा काल़खंड,१९४१ ते १९४५ जपानी अंमलाचा काळ.आणि १९४७  नंतरचा भारतीय काळ.भारताच्या ताब्याती ल या बेटांचा कारभार एक प्रशासक बघतो.इथे आमदार नाहीत.१९६७ पासून राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एक प्रतिनिधी लोकसभेत असतो.प्रशासकाच्या शिफारशी नुसार राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी नेमतात.

आदिवासींचे वास्तव्य

                                 ————–अंदमानात सहा वंशाचे आदिवासी वास्तव्य करून आहेत.त्यामध्ये अंदमानिज,ओंगी,निकोबारी,शोम्पेन,व केरेन ,जारवा,सेंटिनलिज आदिंचा समावेश आहे.अंदमानला गेल्यानंतर सेल्युलर आणि निसर्ग पाहण्याबरोबरच नग्न अवस्थेत जीवन जगणारे आदिवासी पाहणे हा देखिल एक कार्यक्रम असतो.अंदमानाहून बाराटांग भागात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चुनखडीच्या गुहा आणि “मड व्होल्कॅनो’ पहायला जाण्यासाठी जारवांंसाठी राखीव असलेल्य़ा जंगल प्रदेशातूनच जावे लागते.पन्नास किलो मीटरचा हा सारा प्रवास असतो.या मार्गावरून जाण्यासाठी विशिष़्ठ वेळा ठरलेल्या आहेत त्याच वेळेत रस्त्यावरचे फाटक उघडते.परतीच्या वेळेस सायंकाळी तीन नंतर शेवटची वाहने बारटांगहून अंदमानकडे प्रस्थान ठेवतात.त्यांनंतर मग रस्ता बंद होतो.या रस्त्यावरून एकटे वाहन सहसा जात नाही,अनेकदा वाहने पोलिस बंदोबस्तात जातात.याचे कारण विचारले तर सांगितले गेले की,जारवा वाहनांवर हल्ले करतात.पर्यटकाना मारहाण करतात किंवा त्याच्याकडील वस्तू काढून घेतात.त्यांमुळे या प्रदेशात प्रवेश करताच गाडीच्या काचा बंद करा ,फोटो घेऊ नका अशा सूचना दिल्या जातात.आदिवासींना काही खायला देऊ नका असेही सागितले जाते.कारण आपण दिलेल्या खाद्यपदार्थामधून त्यांना फूडपॉयझनिंगचा धोका होऊ शकतो.असे पदार्थ खाल्ल्याने काही आदिवासींचे मृत्यूही झाल्याचे सांगण्यात येते.जारवा दिसतील काय? असा प्रश्न आमच्या गाडी चालकाला विचारल्यावर तो म्हणाला ऩशिब असेल तर दिसतील.पण थोड्‌याच वेळात आम्हाला नशिबाची साथ मिळाली. एक-दोन नव्हे अनेक जारवा स्त्री-पुरूष आणि मुले दिसली.रंगाने काळेभोर पण चमकदार कांती असलेले,उंचीने ठेंगणे,नाकांनी थोडे चपटे,अंगाने राकट.केस कुरूळे आणि ओठ राठ आणि जाड असलेले जारवा पूर्णपणे नग्न असतात.अलिकडे काही जारवा कपडे घालायला लागले आहेत.असे अधुनिक पोषाख घातलेले जारवा तरूणही आम्हाला दिसले.बाह्य जगाशी आजही संबंध नसलेले हे जारवा कंदमुऴ,डुक्कर,मध,मासे खाऊनच स्वतःची उपजिविका करतात.अनेकदा रस्त्याच्या कडेला गटगटाने उभे असलेले आणि येणाऱ्या गाड्यांकडे केविलवाणे काहीतरी खायला मागणारे जारवा दिसतात.या जंगलात जारवाचीं संख्या ३०० ते ४०० च्या आसपास असावी असे सांगण्यात आले.जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही जारवा नाहीत.त्यामुळेच असेल कदाचित अंदमानात जारवांचे मार्केटिंग जोरात चालते.जारवांचे लाकडी पुतळेही विक्रीस उपलब्ध असतात.जारवाच्या नावावर तेथे काहीजण पैसे ही कमवतात.मला हा सारा प्रकार आवडला नाही.एक तर आदिवासी म्हणून आपण त्यांना वर्षानुवर्षे जंगलाच्या बाहर पडू दिले नाही.उलट त्यांच्या नावावर आता पैसे कमविले जातात.आदिवीसींसाठी फाऱश्या काही योजना सुरू आहेत अथवा त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत असे कोठे दिसले नाही.त्यांना मुख्य प्रवाहात आणावे काय या बाबत मतभिन्नता आहे.काहींना वाटते,त्यांना आहे तसेच ठेवावे.मला मात्र अशी इच्छा बाळगणारे क्रु र वाटतात.आपण सारी सुख उपभोगायची आणि त्यांना मात्र जंगलात सोडून घ्यायचे हा प्रकार सभ्य असलेल्या कोणालाच मान्य होणार नाही.जारवाचा वंश टिकला पाहिजे असं वाटणार गट त्यांना माणसात येउ देणार नाहीत.मात्र क्रमशः जारवा कमी होत आहेत ,विविध साथींच्या रोगांना ते बळी पडत आहेत त्याची पर्वा कोणालाच नाही.हे सारे विचार माझ्या मनाच सुरू असतानाच माझ्याबरोबर असलेले छायाचित्रकार सुधीर नाझरे,जे.डी.परडकर.भारत रांजनकर यांनी काही आदिवासींची छायाचित्रे काढली. आदिवासी दिसले की,बारटांगची यात्रा सफल झाली असे मानले जाते.जिता जागता माणूस प्रेक्षणिय वस्तू कशी काय असू शकतो याचे कोडे मात्र मला अजून सुटले नाही.अर्थात पर्यटनाला जाताना असा मनःस्ताप देणारा विचार करायचा ऩसतो याची जाणिव मला झाली आणि आमच्या निवासाच्या ठिकाणी आल्यावर जारवाच्या विषय मी माझ्या डोक्यातून काढून टाकला.जारवा दर्शन कार्यक्रमानंतर आम्ही अनेक ठिकाणं पाहिली त्यात वीस रूपयांच्या नोटीवर जे चित्र आहे तो भागही पाहिला.मनमुराद निसर्ग अनुभवला आणि परतीच्या प्रवासाच्या आधल्या दिवशी पुन्हा एकदा सेल्युलर जेलला भेट देउन सावरकरांना जेथे ठेवले होते ती खोली पाहिले पुन्हा तिचे दर्शन घेतले.१३ सप्टेंबर १८९६  रोजी सेल्युलरचे बांधकाम सुरू झाले ते १९०६ मध्ये पूर्ण झाले.६९८ खोल्यांची भव्यवास्तू आजही ऊत्तम स्थितीत आहे.तेथील फाशी घरआणि अन्य ठिकाणंही अंगावर काटा आणतात.गाईड जी माहिती देतो ती ऐकूनच आपल्या अंगावर काटे उभे राहतात.अशा स्थितीत ज्या स्वातंत्र्यवीरांवर तेथे राहण्याची वेळ आली त्यांच्या मनाची कशी घालमेल झाली असेल.विनायक दामोदर सावरकर यांना  ४ जुलै १९११ रोजी सेल्युलरमध्ये आणले गेले तेह्हा त्यांचे वय जेमतेम तीस वर्षांचे होते.१० ते ११ वर्षे ते सेल्युलरमध्ये होते. हा सारा कालखंड बेरी साऱख्या राक्षसाच्या सान्निध्यात त्यानी कसा काढला असेल याची ज्यांनी हा सेल्युलर जेल पाहिला आहे ते कल्पना करू शकतात. समिधा आणि मिलिंद अष्टीवकर,कृष्णा शेवडीकर आणि आम्ही सारे २७ फेब्रुवारीच्या पहाटे परतीच्या प्रवासासाठी वीर सावरकर विमानतळावर आलो आणि नंतर विमान ऊडाल्यावरही माझे मन मात्र सावरकर ,सेल्युलर भोवतीच पिंंगा घालत होते.विमानात बसल्यावरही विचारांचे काहूूर माझ्या मनात निर्माण झाले होते.आपल्या प्राणाची आहुती देउन अनेक देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण आम्ही या पैकी बहुतेक स्वातंत्र्यविरांची घोर उपेक्ष्रा केली .सावरकर हे त्यापैकी एक  आहेत.आंदमानला जावून आलो त्याला आता सहा महिन्याचा कालावधी ऊलटून गेला पण मुक्तासाठी हा लेख लिहित असतानाही सावरकरांची ती खोली तेथील विषण्णता, सेल्युलरचा तो भीषण दरवाजा,आजही भक्कम स्थितीत असलेली सेल्यिुलरची ती ऐतिहासिक वास्तू सारे सारे माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे दिसते आहे.अंदमानहून परतल्यावर मी सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक वाचले त्यानंतर मी सावरकरवादी झालो नसलो तरी सावरकर भक्त मात्र नक्तीच झालो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here