पत्रकारांनो,असे करा ऑनलाईन मतदान !

0
1202

 

महानगर पत्रकार संघांची ऑनलाईन निवडणूक शहरात पत्रकारांमध्ये उत्साह

मराठी पत्रकार परिषद ही देशातली पत्रकारांची पहिली आणि एकमेव अशी संस्था आहे की,ज्या संस्थेच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं होत आहेत.पुणे महानगर पत्रकार संघ,पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या दोन्ही संस्थांच्या निवडणुका ऑनलाईन होत असून त्याचा डेमो काल यशस्वी झाला.शंभर टक्के मतदारांनी मतदान केले.या पध्दतीमुळे निवडणुकीसाठीचा वेळ वाचणार आहे,खर्च वाचणार आहे,आणि मतदानासाठी रांगेत उभे न राहता घर बसल्या आपण मतदान करू शकणार आहोत.मात्र त्यासाठी आपला मोंबाईल नंबर संघटनेकडे नोंदविलेला असला पाहिजे.अत्यंत सोप्या पध्दतीची ही मतदान प्रक्रिया आहे.मतदारांनी मतदान कसं करावं या संबंंधीच्या काही टिप्स येथे देत आहोत.

अधिकृत मतदारांना

ऑनलाईन मतदान प्रक्रिया मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट इ. साधनांद्वारे करता येईल.

१.आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर लॉगइन आयडी पासवर्डचा मेसेज आल्यावर इंटरनेट सुरू करून आपण स्वतःच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावे

२.लॉगिन झाल्यावर मेन पेजवर मतदान प्रक्रिया माहिती दिलेली आहे.

३.त्यानंतर स्वतःच्या लॉगिन आयडी ने लॉग इन करून मतदान करावयाच्या पेज वर याल,

४.ह्या वेब पेज वर निवडणुकीतील पदे दिसतील, पदावर क्लिक केले असता त्या पदासाठी असलेल्या उमेदवारांची यादी दिसेल.

५. आपण योग्य असलेल्या उमेदवाराला “मतदान करा” ह्या बटनावर क्लिक करावे

६.एका पदाला एकदाच केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल.

७.त्यानंतर पुढे जा ह्या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपण पुढची पदाच्या मतदानासाठी जाल

८.सर्व पदांसाठी मतदान झाल्यावर लॉग आऊट ह्या बटनावर क्लिक करून बाहेर यावे

९.सर्व पदांसाठी मतदान बंधनकारक नाही, आपल्याला ज्या पदासाठी मतदान करावयाचे नाही तेथे “पुढे जा” ह्या बटनावर क्लिक करावे म्हणजे पुढील पदाच्या मतदानासाठी जाल.

१०.मतदान वेळ संपल्यावर मेन पेज वर निवडणूक निकाल लगेच पाहू शकता

११.ऑनलाईन मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय मतदान पद्धती आहे.

१२. आपण आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here