Thursday, April 22, 2021

THANX अशोकराव

Thanx अशोकराव : नांदेडमध्ये उभारलं जाणारंय भव्य पत्रकार भवन

नांदेडः नांदेड शहरात पत्रकार भवन नाही याची खंत सर्वानाच होती.नांदेड शहरानं परिषदेला तीन अध्यक्ष देऊन राज्यातील पत्रकारितेचं नेतृत्व केलं होतं.तरीही शहरात पत्रकार भवन नव्हतं.सिडकोनं जागा दिली होती.मात्र पत्रकारांमधील राजकारणामुळं पत्रकार भवन उभं राहात नव्हतं.ही खंत एस.एम.देशमुख यांनी नांदेडच्या अधिवेशनात अशोकराव चव्हाण यांना बोलून दाखविली.समारोप समारंभास उपस्थित असलेल्या अशोकरावांनी तेव्हा प्रयत्न कऱण्याचे आश्‍वासन दिलं होतं.पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी आणि विभागीय सचिव प्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखील जिल्हा पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळानं अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन त्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्याबद्दल स्वागत केलं.यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी शहरात पत्रकार भवन उभारण्याचा शब्द दिला.अशोकराव एवढयावरच थांबले नाहीत तर त्यांनी 26 जानेवारी रोजी पत्रकार भवनाच्या इमारतीचं भूमीपूजन करण्याचंही नक्की केलं आहे.ही तमाम पत्रकारांसाठी आनंदाची बातमी आहे.मात्र नियोजित पत्रकार भवन सिडकोनं दिलेल्या जागेत न उभं राहता शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं राहावं असं अनेक पत्रकारांना वाटतं.सिडकोचा भाग नांदेड शहराच्या बाहेर आहे.दैनंदिन कामकाजासाठी तेथील पत्रकार भवनाचा तसा भारसा उपयोग होणार नाही.अशोकरावांना विनंती आहे की,शहराच्या मध्यवर्ती कुठे तरी हे भवन उभं राहावं.अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन पत्रकार भवन बांधण्याचा निर्धार केला आहे त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंञी .अशोकराव चव्हाण यांचा राज्य मंञिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंञी म्हणून समावेश झाल्याने मराठी पञकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाच्या वतिने दर्पणदिनाच्या पुर्वसंध्येला सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केल्यानंतर त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासात पञकार बांधवांचे मोठे योगदान असून आपल्या अजेंड्यामध्ये नांदेड शहरात *पञकार भवन* उभारण्याचा समावेश असल्याचे व लवकरच आपण तो पुर्ण करु अशी ग्वाही व अभिवचन दिले होते यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,आ.मोहन हंबर्डे, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.नागेलीकर उपस्थित होते. याप्रसंगी मराठी पञकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे,जेष्ठ पञकार रामप्रसाद खंडेलवाड, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, महानगर सरचिटणीस अभय कुळकजाईकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन चौधरी, अॅड.मो.शाहेद,निळकंठ मदने,कंथक सुर्यतळ, हैदरअली,शिवाजी पन्नासे, साईनाथ पांढरे,मारोती स्वामी,प्रमोद गजभारे, विजय होकर्णे, ज्ञानेश्वर सुनेगांवकर,जोशी आदी पञकार व पदाधिकारी बांधवांची उपस्थिती होती…ना.चव्हाण यांनी आज आढावा बैठकीत येत्या प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी रोजी त्यांचे शुभहस्ते पञकार भवनाचे भूमिपुजन करण्याचा निर्णय घेण्यांत आला…

🙏

..विजय जोशी,जिल्हा प्रतिनिधी,दै.सामना व..कोषाध्यक्ष,मराठी पञकार परिषद,मुंबई.

Related Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,851FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

पत्रकारांसाठी भारत “धोकादायक”

पत्रकारांसाठी भारत धोकादायक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इन्डेक्समध्ये भारत 142 व्या स्थानावर वॉशिंग्टन : कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की,...

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...
error: Content is protected !!