SMS आंदोलन :प्रभावी अस्त्र

0
1324

SMS आंदोलन :एक प्रभावी अस्त्र: देशातला पहिलाच प़योग

पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनसाठी लढा सुरू असताना आंदोलनाचे वेगवेगळे फंडे हाताळले गेले. धरणे, रास्तारोको, उपोषणं, हेल्मेट आंदोलन, पनवेल ते वर्षा कार रॅली, आमदारांची पत्र आणि अशीच अनेक आयुधं वापरली गेली.. सारे मार्ग सनदशीर.. एकही पत्रकार अडचणीत येणार नाही किंवा कोणावर गुन्हा देखील दाखल होणार नाही याची काळजी घेत ही सारी आंदोलनं झाली.. अनेकजण आमची टिंगल करीत, अशा बुळचट मार्गानं यश मिळणार नाही, चार दोन दगड भिरकविलयाशिवाय कोणी दखल घेत नाही असं सांगून आमची माथी भडकविणयाचा प़यत्न अनेक हितसंबंधियांनी अनेक वेळा केला.. आम्ही मात्र सनदशीर मार्ग कधी सोडला नाही.. डोकं शांत ठेऊन चळवळ पुढे नेत राहिलो.. सनदशीर मार्गाच्या आंदोलनाची उपेक्षा ठरलेली असते.. अनेकदा आमची ही उपेक्षा व्हायची, सरकार दुर्लक्ष करायचे..पत्रकारांच्या हक्कासाठीच्या या लढ्याची मिडिया देखील कधी दखल धयायचे नाही.. विशेषतः टीव्ही माध्यमातील बहुतेकांनी चळवळीकडं पार दुर्लक्ष केलं.. रस्त्यावर उतरून आंदोलनं करणं हे पत्रकाराचं काम नाही, SM ला काही उद्योग नाही असे टोमणे हाणले जायचे..मी कधी अशा तंगडेओढू लबाडांची दखल घेतली नाही. हाती घेतलेलं व़त निष्ठेनं निभावत राहिलो.. टीवहीवालयांना टीआरपी हवा असतो .. आमच्या गांधीगिरीनं त्यांचा टीआरपी वाढणार नव्हता.. मात्र आम्ही त्याची कधी काळजी केली नाही..
मधल्या काळात आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट ही होऊ दिली जात नव्हती.. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत होतो पण ही मंडळी सरकार विरोधी आहे असे तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे कान भरविले गेले होते .. परिणामतः मुख्यमंत्र्यांची भेट दुर्मिळ झाली.. मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून चळवळ थांबविणे शक्य नव्हते.. मुख्यमंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री फोन ही घेत नाही हे अनुभवानं कळलं होतं.. पण मुख्यमंत्री SMS तर वाचतात हे माहित होतं.. मग कल्पना सूचली.. एकाच दिवशी हजारो एसएमएस मुख्यमंत्र्यांना पाठवायचे आणि त्यांचं लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधायचं.. .. विषय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणी समोर मांडला.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पुढं ही मांडला.. संमती घेतली.. पहिला प्रयोग केला तेव्हा मुख्यमंत्र्यांना 15,000sms पाठवण्याचं टार्गेट ठरविलं गेलं.. विविध जिल्हयातून जे रिपोर्ट्स तेव्हा मिळाले त्यानुसार 12,000 SMS मुख्यमंत्र्यांना आणि तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्यांना पाठविले गेले.. पुढच्या आंदोलनात 10,000SMS गेले.. दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांचे फोन हॅंग झाले.. SMS पाठवायचे थाबवा, तुमचा प़श्न सोडवतो आहोत असे निरोप आम्हाला आले.. पुढच्या काही दिवसातच संरक्षण कायदा आणि पेन्शन हे दोन्ही निर्णय झाले.. यामध्ये SMS आंदोलनाचा फार मोठा वाटा होता..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने देशात प़थमच अशा पद्धतीचे आणि अनोखे आंदोलन केले.. ते यशस्वी होते हे जगाला दिसले.. SMS आंदोलनाची प़ेरणा कम्युनिस्ट चळवळीपासून घेतलेली आहे.. कम्युनिस्टांची पुर्वी आंदोलनं होतं.. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना हजारो पोस्टकार्ड पाठविली जात. समान मजकूर असलेल्या पोस्टकार्डच्या मारयानं सरकार त्रस्त होत असे.. आता पोस्टकार्डचा जमाना नाही.. मोबाईलचा जमाना आहे. बदललेला काळ लक्षात घेऊन आजच्या परिस्थितीला सुसंगत होईल असं आंदोलन करावं असा विचार केला आणि त्यातून SMS आंदोलनाची कल्पना पुढं आली.. मात्र हे आंदोलन दुधारी शस्त्र आहे.. आवाहन केलं आणि SMS गेले नाहीत तर आपलं हसं होणार हे माहिती होतं.. मात्र परिषदेची ताकद माहिती, परिषदेचा प़त्येक सदस्य लढाऊ आणि चिवट आणि परिषदेचा शाखाविस्तार चांदयापासून बांधापर्यंत झालेला असल्यानं SMS आंदोलन यशस्वी होणार हे माहित होतं. सुदैवानं हा फंडा राज्यातील पत्रकारांना आवडला आणि तीनही वेळेस आंदोलन प़चंड यशस्वी झालं .. परिषदेनं आवाहन केल्यानंतर हजारो SMS चा मारा होतो हे सर्वच नेत्यांना माहिती असल्यानं त्यांनीही परिषदेच्या या गांधीगिरीची धास्ती घेतली.. परवा असंच झालं.. परिषदेच्या रात्री ९ वाजता झालेल्या झूम बैठकीत वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध मागे घ्यावेत यासाठी SMS आंदोलन करायचं ठरलं.. मेसेज सर्वांपर्यंत पोहोचायला रात्रीचे 11 वाजले.. फारच थोडा अवधी हाती असल्यानं 5000 SMS चं टार्गेट ठरविण्यात आले.. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त SMS गेले.. हे सरकारही त्रस्त झालं.. वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध सरकारला मागे घ्यावे लागले.ही SMS आंदोलनाची किमया.. . राज्यातील पत्रकारांच्या हाती हे एक प्रभावी अस्त्र मिळालं आहे.. थोडं नियोजन केलं तर आंदोलन यशस्वी होते हा अनुभव आहे.. या अनोख्या आणि देशात प्रथमच केल्या गेलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व मित्रांना धन्यवाद..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here