ज्येष्ठ संपादकास आलेला एक अनुभव..त्यांच्याच शब्दात
एक वास्तव…
आजची ताजी घटना…पार्ले भाजी मार्केट, वेळ 6.30 ते 7.00 संध्याकाळी
मी आणि बायको पार्ल्यात भाजी मार्केट मध्ये गेलो होतो.. तेथे एक महिला पोलिस अधिकारी भाजी घेत घेत गाडीतून आल्या..
रस्त्यावर काही बाईक्स होत्या…बाईंचा पारा चढला त्यांनी ड्रायव्हरला बाईक्स वाल्यांचे लायसन्स घ्यायला सांगितले.. ड्रायव्हर खाली उतरून बाईक्स वाल्यांशी हुज्जत घालू लागले.. संध्याकाळ ची वेळ असल्याने मार्केट रोडला गर्दी होती.. हातात सामान असल्याने मी रिक्षासाठी थांबलो होतो..
मी पोलिस ड्रायव्हर म्हटले, तुम्हीच नियमानुसार वागले तर कारवाई गतीने होईल , तुमची गाडी रस्त्यावर मध्येच उभी असल्याने मागे ट्रँफिक जाम झालेय… हे म्हणून रिक्षासाठी आम्ही दोघे पार्लेश्वर च्या दिशेने चालत निघालो..
दोन चार मिनिटात पोलिस गाडी माझ्या शेजारी आली..
महिला पोलिस अधिकारी म्हणाल्या, ए शाण्या चालण्यासाठी फूटपाथ असतात हे कळत नाही का? मी म्हटले.. फुटपाथ रिकामे असतील तर चालणार ना… माझे उत्तर ऐकून अधिकरी संतापल्या…माझी अक्कल काढली.. त्यावरुन तू तू मै मै झाले… माझ्या बायकोलाही अदातदा बोलल्या.. तोवर तेथे गर्दी जमली.. एकाने मला सांगितले आपण कौटुंबिक माणसे..कुठे नादी लागताय(त्यांचा हा सल्ला पटणारा होता) मी पुढे निघालो तर बाईंचा आवाज आणखीन वाढला.. मी त्या अधिकारी ना नाव विचारले तर त्या संतापल्या…कायद्याची भाषा शिकवू का? अशी धमकी दिली..
यात बायकोला रडू कोसळले…एकाने रिक्षा थांबवून आम्हाला जा असे सांगितले…. आम्ही निघालो..
आता सांगा आपण कायद्याचे रक्षण करणा-या पोलिसांचे काय करणार..
या घाईत आणि वादात मी त्या गाडीचा नंबरही घेतला नाही… स्काँर्पिओ होती.आणि त्यात आणखीन एक महिला होत्या…
नरेद़ कोठेकर, संपादक, नवराषट़
———————————————————————————————————–
नरेंद्र कोठेकर हे एक प्रामाणिकपणे,निष्ठेने पत्रकारिता करणारे संपादक आहेत.ते नवराष्ट्र चे संपादक तर आहेतच त्याचबरोबर विविध वाहिन्यांवर प्रचलित विषयांवरील चर्चेत ते सातत्यानं सहभागी होत असतात.त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडू शकतो तर ग्रामीण भागातील सामांन्य पत्रकारांची स्थिती कशी असू शकते याचा आपण विचारच केलेला बरा.पत्रकार संरक्षण कायदा झाला तर असे प्रकार बर्याच प्रमाणात थांबू शकतात मात्र सरकार त्यासाठी अक्षम्य चालढकल करीत आहे.