6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे 40वे अधिवेशन

0
666

पिंपरी-चिंचवड दिनांक 17 (प्रतिनिधी) 75 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे 40वे अखिल भारतीय अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून 2015 रोजी पुणे जिल्हयात पिंपरी-चिंचवड येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि सरचिटणीस संतोष पवार यांनी काल येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्दघाटन पंरपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून अधिवेशनाचे अध्यक्षस्थान परिषदेेचे अध्यक्ष किरण नाईक भूषविणार आहेत.7 जून रोजी समारोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कऱण्याचे नियोजन असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भोसरी येथील लांडे सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.पत्रकारितेचे बदलते प्रवाह,पत्रकारांवरील वाढते हल्ले,सोशल मिडिया या आणि अशाच ज्वलंत विषयावर परिसंवादाचे आयोजन कऱण्यात आले आहे.यामध्ये देशभरातील मान्यवर पत्रकार सहभागी होतील.एका ज्येष्ठ पत्रकाराची प्रकट मुलाखत,परिषदेची वार्षिक सर्वसाधाऱण सभा तसेच 6जून रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.परिषदेने नुकतेच 75 वर्षे पूर्ण केले आहेत.त्याबद्दल परिषदेची स्थापना,परिषदेच्या वाटचालीतील महत्वाच्या घटना,माजी अध्यक्षांचा परिचय तसेच पहिल्या अकरा अध्यक्षांनी अधिवेशनात केलेली भाषणं याचं एस.एम.देशमुख यांनी केलेल्या संकलनाचे 400 पानी पुस्तकही अधिवेशनात प्रसिध्द करण्यात येणार आहे.परिषदेच्या माजी अध्यक्षांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.
दर दोन वर्षांनी होणा़ऱ्या या अधिवेशनास देशभरातून अडिच हजार पत्रकार उपस्थित राहतील,त्यांची निवास,भोजण व्यवस्था कऱण्यात येणार असून पिंपरी-चिंचवड तालुका पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ हे अधिवेशनाचे आयोजक आहेत.मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना असून तिची उल्लेख मातृसंस्था असा केला जातो.त्यामुळे परिषदेच्या या अधिवेशनास पत्रकारांनी मोठ्या संख्याने उपस्थित राहावे असे आवाहनी एस.एम.देशमुख आणि संतोष पवार यांनी केले आहे.दोन वर्षांपूर्वी परिषदेचे अधिवेशन औरंगाबाद येथे झाले ेहोते.
पत्रकार परिषदेस परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे,उपाध्यक्ष दत्ताजी सुर्वे,िं सुनील वाळुंज पपराी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ,पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कापसे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here