रायगडावर “साराच” अंधार

0
1564

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणार आहे.त्याचं भूमीपूजन येत्या 19 फेब्रुवारीला करायचं सरकारचं नियोजन आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तशी घोषणा केलीय.चांगली गोष्ट आहे.स्मारकाला विरोध करण्याचं कारण नाही, मात्र महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेचं दुःख वेगळं आहे.ज्या रायगडावर महाराजाचं वास्तव्य होतं,ज्या रायगाडावर महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना घडल्या,आणि ज्या उत्तुग रायगडाची महाराजांनी राजधानी म्हणून निवड केली त्या रायगडाची आज जी उपेक्षा सुरूय ती नव्या स्मारकाच्या गदारोळात कोणाला दिसत नाही ही गोष्ट संतापजनक आहे.अरबी समुद्रातील स्मारकासाठी शंभर काय आणखी शंभर कोटी ख र्च केले तरी हरकत नाही पण मग रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी देखील काही नि धी सरकारनं दिलाच पाहिजे.असं झालं नाही तर नव्या स्मारकाचा जो घाट सरकारनं घातला आहे तो राजकारण्याच्या बेगडी शिवप्रेमाचा नमुना आहे असा आरोप करता येऊ शकेल.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते रायगडावर आले होते आणि त्यांनी गडासाठी एक कोटी रूपये मंजूर केले होते.केव्हा तरी तो नि धी आला पण आभाळच फाटलंय म्हटल्यावर ं एक कोटी रूपयांत कुठं कुठं ढिगळं लावणार होते.थोडी फार काम त्या रक्कमेतून झाली पण किल्लयाची अवकळा मात्र त्यानं दूर झाली नाही.किल्ल्याचं खऱ्या अर्थानं सवर्धन करायचं तर मोठा नि धी  रायगडसाठी द्यावा लागेल.त्यासाठी सरकारची तयारी नाही त्यामुळं अशीच उपेक्षा सुरू राहिली तर महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेला हा किल्ला कालौघात इतिहास जमा होत जाईल यात शंकाच नाही.त्यामुळं मतांच्या बेगमीसाठी अरबी समुद्रात स्मारक उभारतानंाच रायगडकडंही थोडं प्रेमाणं,आपुलकीनं बघण्याची गरज आहे असं वाटतं.

– रायगड किल्लाला पुरातत्व विभागाचा विळखा पडलाय .कोणताही विषय मांडला तरी नकारखंटा वाजविणं हा पुरातत्वचा आवडता छंद आहे.जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावरील सडलेली पत्रं बदलायची असली तरी पुरातत्व त्यासाठी नन्नाचा पाढा वाचते.केवळं नकारघटा हातात घेऊन फिरणाऱ्या पुरातत्वचं किल्लयावर कुठंच अस्तित्व दिसत नाही.कोसळत चाललेले  चिरे थांबविण्यासाठी देखील या विभागाकडं नि धी नसल्यानं या विभागाचा काहीच उपयोग नाही.खिश्यात दमडाच नसल्यानं विभागाला कोणी हिंगलावून देखील विचारत नाही.त्यामुळं किल्ल्यावर अनेक घटकांची संतापजनक दादागिरी सुरू असते.किल्ल्याचं नियंत्रण कोणाकडंच नसल्यानं प्रत्येकजण मनमानी पध्दतीनं वागत असतो.शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रजी तारखेप्रमाणे करायचा की,तिथी नुसार यावरून वाद,पुतळा मेघडंबरीत बसवायचा की, अन्य कुठे यावरून वाद,पुतळा कोणत्या धातूचा असावा यावरून वाद,वाघ्या कुत्र्याची समाधी असावी की ती उखडून फेकावी यावरून वाद अशा अनेक वादात किल्ला अडकेलेला आहे.यावादात भर पडलेली आहे ती स्थानिक आणि बाहेरचे या वादाची.विविध शिवप्रमी संघटना आणि महाराजांमधील वादाची.सांगितल्या गेलेल्या इतिहासाला चिकटून राहणाऱ्या आणि नवा इतिहास लिहायला निघालेल्यांमधील वादांची.आपण लोकशाहीत असल्यानं हे वाद घालायलाही हरकत नाही पण या वादाचा फटका किल्ल्याला बसत आहे.सरकार आज जी किल्ल्याची उपेक्षा करतंय त्याचं मुख्य कारण या साऱ्या वादात आहे.रायगड हा राज्यकर्त्यांसाठी संवेदनशील विषय आहे.अनेकपदरी वादात अडकलेल्या या किल्ल्यासाठी काही करायचं ठरविलं तरी नवा वाद उत्तन्न होतो हा अनुभव असल्यानं राज्यकर्त्यांनी किल्ल्याकडं दुर्लक्ष करीत नव्या स्मारकाचा घाट घालावा हे राजकीयदृष्टया अधिक सोयीचं होतं आणि आहे.त्यामुळं आघाडीवाले असू देत नाही तर सध्याचे शासनकर्ते असू देत रायगड या विषयावर शक्यतो बोलतच नाहीत.  किल्ल्याची डागडुजी करायच्याही भानगडीत कोणी पडत नाही. निवडणुकीच्या अगोदर काही नेत्यांनी अशी घोषणा केली होती की आमचं सरकार आलं तर रायगडावर शपथविधी केला जाईल.सत्ता आली, सारं झालं  रायगडाची आठवण कोणाला झाली नाही.रायगडात अफवा अशी आहे की,काही प्रसंगी मुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री किल्लयावर आला की,त्याचं सत्तास्थान डळमळीत होतं.या अफवेचा परिणामही राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि ते किल्ल्याकडंच पाठ फिरवितात.मग तेथील संवर्धन विषयक उपाययोजना दूरच राहतात.  राजकारण्यांना ज्याची भिती वाटते तीच भिती पत्रकार,लेखक,कलावंतांनाही असते.किल्लयाच्या संदर्भात केलेली कोणतीही सूचना सर्वांना आवडतेच असं होत नाही.ज्यांना ती सूचना पचनी पडत नाही असे घटक मग हातात दगड घेऊन थेट संबंधितांच्या घरावर चाल करून जातात.त्यामुळे पत्रकार असोत की,कलावंत त्यांनीही हा विषय वर्ज्ये करून टाकला आहे.त्यामुळं रायगडच्या संबवर्धनाबाबत तेथील समस्याबाबत जी विधायक आणि मनमोकळेपणाने  च र्चा व्हायला हवी  ती होतच नाही. त्यामुळं किल्लयाची उपेक्षा थांबत नाही.कल्ल्यावर साधी वीज नसावी,होळीच्या माळावरचा महाराजांचा किल्ला रात्री अंधारात असावा हे दुःख जिव्हारी लागणारं असलं तरी ते वास्तव आहे. चौकशी केली तेव्हा सांगण्यात आलं की,वीज बिल न भरल्यानं मंडळानं वीज पुरवठा खंडित केलाय.मंडळाला शरम याची वाटायला हवी की,रायगडातच अशा अनेक बड्या कंपन्या आहेत की,त्यांच्याक डून मंडळाचे कोट्यवधी रूपये येणे बाकी आहेत.मंडळ त्यांचा पुरवठा एक दिवसही खंडित करू शकत नाही.रायगडावरचा मात्र लगेच वीज पुरवठा तोडला जातो.याला काय म्हणावं? राज्यात मोगलाई आहे असा अ र्थ काढायचा का.?  सूचना अशी आहे की,मंडळानं स्वखर्चानं रायगडाला वीज द्यावी एवढंच नव्हे तर पुरातत्व विभाग,जिल्हा परिषद आणि वीज मंडळानं सारा रायगड फ्लड लाईटनं लखलखून टाकावा.असं केलं तर मंडळाचं फार काही बिघडणार नाही.पण ते होत नाही म्हणून मध्यंतरी सोलर दिवे लावले गेले.ते लगेच बंद पडले.आता अंधार आहे अंधार आहेच पण महाराजांना अत्यंत प्रिय असलेला हा रायगड आता उघडा बोडखाही झालाय.होळीच्या माळापासून समाधीस्थळापर्यत एकही झाड नाही.रखरखत्या उन्हात शिवप्रमी जनतेला पायपीट करावी लागले.हा सारा किल्ला विविध प्रकारची वृक्ष लाऊन हिरवागार केला तर किल्लयाची शोभा कित्येक पटीनं वाढेल पण तेही होताना दिसत नाही.विविध कारणांनी वाद घालणारे जे घटक आहेत ते देखील केवळ वाद घालायच्या उदेद्‌शानंच येतात ,वाद घालून झालं की परत जातात आणि मग पुन्हा नवा वाद घेऊनच येतात.दरम्यानच्या काळात किल्ल्याचे किती चिरे ढासळले आहेत हे पाहण्याची तसदी कोणी घेत नाही ही खंत स्थानिकांना आहे.वादावादी कणऱाऱ्यांनी आम्ही दरवर्षी किल्लयावर शंभर झाडं लावू आणि ते ज गवू असा नि र्धार का करू नये?.पण ते होत नाही.ते जाऊ द्या होळीच्या माळावर दररोज जो सनई-चौघडा वाजायचा तो देखील बंद पडलाय.गोष्टी साध्या साध्या आहेत पण त्या भावनिक असल्यानंच त्या कटाक्षानं झाल्या पाहिजेत असं आग्रहानं सांगावं वाटतं.

म हाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी दररोज अक्षरशः – हजारो पर्यटक गडावर येत असतात.येताना आणि जाताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.मुळात मुंबई-गोवा हायवे सोडून किल्लयाकडं जाणा़ऱ्या रस्त्याची जी अवस्था आहे त्यावरून किल्ल्याच्या अवस्थेची कल्पना यायला सुरूवात होते.मग किल्लयाजवळ आल्यावर रोप वे वाल्यांची अरेरावी,आणि वरती गेल्यानंतर किल्लायाचं अंतरंग पाहून मनाची कालवाकालव झाल्याशिवाय राहात नाही.पर्यटकांसाठी कुठं सूचना फलक नाहीत,कुठं मागदर्शन नाही,कुठे सरकारी गाईड नाहीत,कुठं पाण्याची व्यवस्था नाही,कुठं झाड नाही.जे गडावर वारंवार जातात त्यांना हे सारं परिचयाचं झालेलं असलं तरी पहिल्यांदाच येणारे किल्लयाची अवस्था पाहून राज्यकर्त्यांना चार शिव्या हासाडल्याशिवाय नक्कीच राहात नाहीत.  शनिवार वाड्याप्रमाणंच गडावर लाईट ऍन्ड म्युझिकचा शो करायला काय हरकत आहे.? यालाही विरोध कऱणारे करतील पण महाराजांचा इतिहास त्यांच्याच गडावर जिवंत झालेला पाहून नक्कीच नव्या पिढीला नवी प्ररणा मिळू शकेल.

– किल्लयाची ही सारी स्थिती बदलायची असेल तर सर्वसंंबंधित घटकांनी एकत्र येत सरकारच्या मदतीनं निर्धारानं काही केलं पाहिजे.मुळात प्रारंभी म्हटल्याप्रमाणे आज किल्लयावर कोणाचं नियंत्रण नाही.ज्यांच्या पाठिशी शंभर-पन्नास लोकांचा समुह आहे अशा शक्ती गडावर येऊन  वाट्टेस तशी मनमानी करीत असतात. – विषयच एवढा संवेदनशील आहे की,त्यांना रोखण्याची कुणाची बिशाद नाही.हे अगोदर कायद्याचा बडगा वापरून थांबलं पाहिजे.ते थांबवायचं असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन एखादी रायगड संनियंत्रण समिती स्थापन केली जावी.या समितीचं अध्यक्षस्थान हे जिल्हाधिकाऱ्यांकडं असावं आणि त्यात स्थानिक प्रमुख शिवप्रमी संघटनांचे प्रतिनिधी,बाहेरच्या संघटनांचे प्रतिनिधी,शिवप्रेमी जनतेचे प्रतिनिधी,प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,स्थानिक लोकप्रतिनिधी,जे गादीचे वंशज आहेत त्यांचे प्रतिनिधी,पत्रकाराचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधधी त्यात असावेत आणि या समितीमार्फत किल्ल्याचं नियोजन ,देखरेख ,संवर्धन आणि जमलंच तर विकाल केलंा जावंा.या सूचनेला पुरातत्व विभागाची अडचण येईल पण पुरातत्व विभाग म्हणजे कोणी पाकिस्तानी व्यवस्था नाही.केंद्र सरकारनं लक्ष घालून किमान रायगडपुरती तरी पुरातत्व विभागाच्या अरेरावीला वसेण घालावी आणि अशी काही व्यवस्था करता येऊ शकेल काय या अंगानं विचार करावा.ही समिती किल्लाची सारी देखरेख करील.आपल्याकडं अनेक देवस्थानच्या कमिट्या आहेत.शिर्डीच्या साईमंदिरासाठी सरकारी समिती आहे.तुळजापूर मंदिराच्या समितीच्या अध्यक्षपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत.त्या ध र्तीवर एक प्रयोग म्हणून रायगडलाही अशी समिती नेमली जावी आणि त्या समितीला योग्य तो नि धी उपलब्ध करून रायगडचं वैभव पुन्हा निर्माण करण्याचा सरकारनं प्रयत्न करावा अशी इच्छा आहे.

 रायगडवर मी अनेकदा गेलो होतो.मात्र किल्ल्यावर मुक्काम करण्याची संधी मिळाली नव्हती.दीपक शिंदे यांनी रायगड प्रेस क्लबची बैठक किल्लयावर घेण्याची सूचना केल्यानंतर तो योग आला.रात्रीच्या अंधारात दिवसाच्या उजेडाता किल्ल्याच्या अनेक प्रश्नांची च र्चा दिपक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी झाली. गडावरील वीज,पाणी आणि अन्य काही प्रश्नांच्या संदर्भात रायगड प्रेस क्लबचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहे.मात्र त्यानं काही होईल असं वाटत नाही.सरकारलाच किल्ल्याच्या बाबतीती काही धोरणात्मक नि र्णय़ घ्यावा लागेल.तो घेतला नाही अन उद्या अरबी समुद्रालते स्मारक झाले तर शिवप्रमीची ग र्दी रायगड ऐवजी अरबी समुद्रातील स्मारकाकडंच वाहू लागेल आणि मग रायगडची अधिकच हेळसांड व्हायला लागेल.अशी वेळ येऊ नये यासाठी शिवप्रमींनी आतापासूनच रायगड संवर्धनासाठी सरकारवर दबाव वाढविला पाहिजे.

एस.एम,देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here