रायगड जिल्हा परिषदेचा 51 कोटींचा अर्थसंकल्प सादर 

 

रायगड जिल्हयात नव्यानेच निर्माण झालेली पनवेल महापालिका आणि काही नगरपंचायतींची निर्मिती झालेली असल्यानं रायगड जिल्हा परिषदेच्चा उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे.याचा फटका जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला बसलेला असला तरी सर्वांनी एकत्र जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन करीतच रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला.2017-18 साठीचा 82  कोटी 73 लाख 3 हजार 198 कोटींचा अंतिम तर 2018 आणि 2019 वर्षासाठीची 51 कोटी 6 लाख 99 हजार 198 रूपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्पात सर्वाधिक 14 कोटींची तरतूद इमारती आणि दळणवळणासाठी केली गेलीय.त्या खालोखाल प्रत्येकी 9 कोटी पन्नास लाखांची तरतूद सार्वजनिक आरोग्य आणि समाजकल्याण विभागासाठी केली गेलीय.पर्यटन विभागासाठीही नाविण्यपूर्ण योजना तयार केल्या गेल्या आहेत.शाळकरी मुलींना कराटे प्रशिक्षण,महिलांना स्वयंरोजगार व व्यायाम शाळांसाठी तरतूद,शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारा,अपंग मुलांची काळजी घेणारा हा अर्थसंकल्प आहे.सभागृहानं हा अर्थसंकल्प एकमतानं मंजूर केला.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा 91 वर्धापन दिन साजरा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समतेचा लढा उभारला.या ऐतिहासिक घटनेला यंदा 91 वर्षे पूर्ण झाले आहेत.20 मार्च रोजी हजारो आंबेडकर अनुयायी महाडला येतात आणि महामानवाला अभिवादन करतात.यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कऱण्यासाठी जनसागर लोटला होता.आंबेडकरी जनतेनं चवदार तळे आणि क्रांतीस्तभ येथे जाऊन अभिवादन केले.चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्यावतीने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.यावेळी बोलताना त्यांनी ‘चवदार तळ्याच्या सत्याह्रहातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य ,समता,न्याय आणि बंधुता या विचारांची चेतना दिली.या विचारानुसार मार्गक्रमण करूनच देश प्रगतीपथावर जावू शकेल’ असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुप्पहार अर्पण करून अभिवादन केले.नगरपालिका तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाण्याची,भोजणाची व्यवस्था केली होती.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.–

 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गानजिकची 71 गावं स्मार्ट होणार 

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत असलेली पनवेल तालुक्यातील 17 आणि खालापूर तालुक्यातील 54 गावं स्मार्ट होणार आहेत.तशी अघिसूचना महाराष्ट्र सासनाच्या नगरविकास विभागानं काढली आहे.एवढंच नव्हे तर विकास आराखडा तयार कऱण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली गेली आहे.येत्या डिसेंबरपासून या कामाला सुरूवात होणार आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांना रस्ते,पाणी यासारख्या मुलभूत सुविधांसह औद्योगिक,शैक्षणिक आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती सहयोगी अधिकारी सारिका बोधनकर यांनी दिली आहे.विशेष म्हणजे जमिनी संपादित करताना जबरदस्ती न करता शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार त्या अधिगृहित केल्या जाणार आहेत .विकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्‍वासात घेऊन आणि त्याच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतले जावेत यासाठी नुकतीच खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात बैठक  झाली..विकासाला विरोध नाही पण यामध्ये स्थानिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना यावेळी केल्या गेल्या हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा परिसराचा चेहरा-मोहराच बदलून गेलेला असेल.अगोदरच खालापूरसह दहा गावांना स्मार्ट करणारा नैना प्रकल्प तालुक्यात राबविला जात आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं 25 किलो मिटरच्या परिसराचा कायापालट होणार आहे.त्यामुळं येत्या काही दिवसात या संपूर्ण परिसराचे रंगरूप बदलले असणार आहेत.

हापूसचे उत्पादन घटणार 

मोहोर येण्याच्या सुमारासच नोव्हेंबरमध्ये ओखी वादळाचा बसलेला तडाखा आणि मागच्या आठवडयात  रायगडात असलेले ढगाळ वातावरण,धुके आणि अवेळी पावसाचा मोठा फटका यंदा हापूसला बसला आहे .त्यामुळे उत्पादनात तब्बल ७० टक्के घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.वातावरण पूरक असेल तर पाडव्याला मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात येत असतो.मात्र यंदा नवी मुंबईच्या बाजारात दरवर्षीच्या तुलनेत  आवक तब्बल 20 ते 30 हजार पेटयांनी घटली आहे.पुढील काळातही आवक लगेच वाढेल अशी स्थिती नाही.असे .चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कोकणात आंबा पिकाकडे पाहिले जाते मात्र गेली काही वर्षे सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने आंबा उत्पादक जेरीस आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here