46 व्या अधिवेशनासाठी ‘परिषदे’कडे तीन संघांचे प्रस्ताव

0
819


अधिवेशन आपल्याला मिळावे म्हणून जिल्हा संघांची चढाओढ,


मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक अधिवेशन कोठे होणार ? हा राज्यातील तमाम पत्रकारांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.दर दोन वर्षांनी जानेवारीपासूनच त्याबाबतची विचारणा पत्रकारांकडून होत असते.अधिवेशनासाठी राज्यभरातून किमान दोन हजार पत्रकार उपस्थित असतात.2011 मध्ये रोह्यात अधिवेशन झाले,2013 ला औरंगाबादला झाले,2015 ला पिंपरी-चिंचवडमध्ये हा उत्सव साजरा झाला आणि 2017 मध्ये शेगावमध्ये अधिवेशन संपन्न झाले.शेगावच्या अधिवेशनाने उपस्थितीचे सारे रेकॉर्ड मोडले.2200 पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित होते.2019 मध्ये होणार्‍या परिषदेच्या 46 व्या अधिवेशनासाठी 2500 पत्रकार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे

अधिवेशनास पत्रकार येतात,चर्चा करतात,संवाद साधतात.अधिवेशनात विचारमंथन होते,माध्यमातील नव्या बदलांची माहिती होते.आणि पत्रकारांची चळवळ यातून मजबूत होते.
अधिवेशनातील पत्रकारांची उपस्थिती,त्यांची निवास व भोजन व्यवस्था करणे ही कामं अवघड असते.अधिवेशनासाठी लागणारा निधी हा देखील महत्वाचा विषय होता.अगोदर अधिवेशनासाठी सरकार तीन लाख रूपये द्यायचे विद्यमान सरकारने त्यावर फुली मारली आहे.पत्रकारांची चळवळ मोडून पडली पाहिजे हाच त्यामागचा एकमेव उद्देश आहे,अर्थात त्यानंतरही अधिवेशन होत गेली.या अधिवेशनास मुख्यमंत्र्यांनी यावं पत्रकारांशी हितगुज करावं,पत्रकारांच्या प्रश्‍नांवर काही घोषणा कराव्यात हा प्रघात होता.शेगाव अधिवेशऩापासून मुख्यमंत्र्यांनी तो खंडित केला.अनेक प्रयत्न करूनही मुख्यमंत्री शेगावच्या उद्दघाटनासाठी आलेच नाहीत.अर्थात त्याचा उपस्थितीवर कोणताच परिणाम झाला नाही.बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघानं उत्कृष्ट अधिवेशन करून दाखविले.
2019 चे अधिवेशन आम्हाला द्यावे अशी विनंती करणारे तीन प्रस्ताव मराठी पत्रकार परिषदेकडे आले आहेत.त्यात लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आहे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आहे आणि शिर्डीचाही एक प्रस्ताव आहे.शेगावच्या अधिवेशनात शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी पुढील अधिवेशन शिर्डीत व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती.या तीनही प्रस्तावावर परिषद चर्चा करून एका जागेची लवकरच निवड करेल.परिषदेचे अधिवेशन आपल्याला घेण्याची संधी मिळावी यासाठी चढाओढ लागावी ही एक आनंदाची बातमी आहे.एक काळ असा होता की,अधिवेशन होणार की नाही अशी स्थिती असायची आज अधिवेशन कोणाला द्यावे असा प्रश्‍न पडतोय हा बदल परिषदेसाठी आनंददायक नक्कीच आहे.पत्रकारांनी परिषदेवर दाखविलेलं प्रेम आणि विश्‍वास याचं हे प्रतिक आहे असं आम्हाला वाटतं.

निवडणुका नंतर म्हणेज जूनच्या अखेरीस हे अधिवेसन होईल .यावेळेस अधिवेशनात नेहमी पेक्षा वेगळे विषय असतील,अनेक मान्यवर वक्ते अधिवेशनासाठी निमंत्रित केले जातील,थोडक्यात अधिवेशन हटके होईल.तुर्तास अधिवेशन घेण्याची तयारी दाखविलेल्या तीनही संघांचे आभार.यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here