अलिबागःरायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.त्यांना आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अनंत गीते  यांच्यापेक्षा 31 हजार 438 मते अधिक मिळाली आहेत.सुनील तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 मते मिळाली तर अनंत गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली आहेत.त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी रात्री सुनील तटकरे यांना विजयी घोषित केले आहे.
या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीच्या सुमन कोळी यांना 23 हजार 196 मते मिळाली आहेत तर नोटाला 11490 मते मिळाली आहेत.राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे आणि सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्ष उमेदवारांना  मिळून    13 हजार 878 मते मिळाली आहेत. रायगडच्या रणांगणात एकून 16 उमेदवार उतरले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here