300 पत्रकारांची ‘छुट्टी’…

0
2444

मुंबईः
एनडीटीव्हीच्या विरोधात जेव्हा सरकारनं कारवाईचं हत्यार उपसलं तेव्हा माध्यम स्वातंत्र्यासाठी देशातील सर्व पत्रकार एकत्र आले.आवाज उठविला.परिणामतः सरकारला एनडीटीव्हीवरील कारवाईला स्थगिती द्यावी लागली.अगदी जेमतेम एका वर्षापुर्वीच घडलेली ही घटना एनडीटीव्हीचे चेअरमन प्रणय रॉय विसरलेत.एनडीटीव्हीनं आता चार-दोन नाही तर तब्बल तीनेशे पत्रकारांना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.एनडीटीव्ही आपल्या स्टाफमध्ये 25 टक्क्यांची कपात करतेय.दोन दिवसांपुर्वीच पहिल्या 50 पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांना घरी पाठविलं गेलं.याचं कारण असं सांगितलं जातंय की,एनडीटीव्हीला सरकारी जाहिराती मिळत नाहीत.त्यामुळं महसुलात घट झालीय.त्यामुळं खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी हे पाऊल उचलावं लागतंय.प्रणव रॉय हे स्वतः पत्रकार आहेत.पत्रकारांची अवस्था त्यांना चांगली अवगतय.असं असतानाही ते पत्रकारांना रस्त्यावर आणायला निघाले आहेत.एनडीटीव्हीच्या या कृतीचा दिल्लीत पत्रकारांनी निषेध केला आहे.प्रेस क्लब ऑफ इंडियानं प्रणव रॉय यांना पत्र पाठवून प्रेस क्लबमध्ये येऊन याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.अन्य पत्रकार संघटनांनीही याचा विरोध आणि निषेध केला आङे.मराठी पत्रकार परिषद देखील या कृतीचा विरोध करीत आहे.याचं कारण असं की,300 पत्रकारांवर चालविलेली करवत दुर्लक्षिली गेली तर अन्य ठिकाणी देखील याच धर्तीवर पत्रकारांना रस्त्यावर आणण्याचा कार्यक्रम सुरू होईल.त्यामुळं एनडीटीव्हीच्या या निर्णयाचा विरोध झाला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here