3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

0
643

3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस.गेल्या वर्षी पासून हा दिवस आपण ” पत्रकार आरोग्य तपासणी दिन” म्हणून राज्यभर साजरा करतो आहोत.या दिवशी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी स्थानिक अन्य पत्रकार संघांना विश्‍वासात घेत आणि डॉक्टर संघटनेच्या मदतीने किंवा जिल्हा रूग्णालय किंवा उपजिल्हा रूग्णालयाच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरं घ्यावीत.यामध्ये पत्रकाराच्या कुटुंबाची तपासणी करावी.यामध्ये एखादया पत्रकारास पुढील उपचाराची गरज भासल्यास मराठी पत्रकार परिषदेशी संपर्क साधावा.3 डिसेंबरपासून मुंबईत मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली “पत्रकार आरोग्य सेवा कक्ष’ सुरू करण्यात येत असून राज्यातील गरजू पत्रकारांना मुंबईत उपचारासाठी हा कक्ष मदत करणार आहे.या कक्षात मंगेश चिवटे,विनोद जगदाळे,सुनील ढेपे,मिलिंद अष्टीवकर आदिंचा समावेश असणार आहे.तेव्हा जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांना विनंती की,आरोग्य तपासणी दिन आरोग्य तपासणी करूनयशस्वी करावा

प्रकृत्तीकडे दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्रात गेल्या वर्षात किमान पाच पत्रकारांचे हार्टफेल होऊन निधन झाले आहे.हे सारे पत्रकार चाळीशीच्या आतील होते.सातत्यानं होणारी दगदग,कामाचा ताण त्यामुळे येणारे तणाव,खाण्यापिण्याच्या सवयी,अवेळी जेवण आणि जाग्रणं या सर्वाचा आपल्या प्रकृत्तीवर परिणाम होत असतो.हा सारा कामाचा भाग असल्याने ते टाळणेही शक्य नाही.अशा स्थितीत प्रकृत्तीची काळजी घेणे एवढेच आपल्या हाती उरते.त्यामुळेच परिषदेने गेल्या वर्षीपासून 3 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित कऱण्याचा निर्णय घेतलेला आहे.गेल्या वर्षी 14 जिल्हयात ही शिबिरं झाली यावर्षी संपूर्ण राज्यात आरोग्य तपासणी व्हावी अशी परिषदेचा प्रयत्न आहे.तेव्हा परिषदेशी संलग्न संघ आणि अन्य पत्रकार संघटनांना विनंती आहे की,आरोग्य तपासणी शिबिराचा हा कार्यक्रम यशस्वी करावा
विनित
एस.एम.देशमुख
किरण नाईक
सिध्दार्थ शर्मा
यशवंत पवार
मिलिंद अष्टीवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here