२०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषीत 
मुंबईः येत्या 27 तारखेला शासकीय पत्रकार पुरस्कार वितरण महासोहळा होणार आहे.महासोहळा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे 2016,2017 आणि 2018 या काळातील जाहीर झालेले पुरस्कार एकाच वेळी दिले जाणार आहेत.ज्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत अशा पत्रकारांची संख्या 65 च्या वरती आहे.प्रत्येक पुरस्कारासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला गेला तरी मुख्यमंत्र्यांचे सव्वादोन तास पुरस्कार वितरण करण्यात जाणार आहेत.म्हणजे ना पुरस्कार घेणार्‍यांना आनंद ना..देणार्‍यांना.हा महासोहळा म्हणजे उपक्रम उरकण्याचाच एक सोहळा ठरणार आहे.खरं म्हणजे सरकारनं अत्यंत सन्मानाने,आदरपूर्वक आणि पत्रकारांची प्रतिष्ठा जपली जाईल अशा पध्दतीनं या पुरस्कारांचे वितरण करणं अपेक्षित असतं पण तसं होत नाही.तीन–तीन वर्षांचे पुरस्कार एक गठ्टा पध्दतीनं दिले जातात.65 पत्रकारांना दिले जाणारे हे पुरस्कार वितरण महागोंधळ ठरणार हे वेगळे सांगायलाच नको.ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळाले आहेत अशा सर्वांचे मनापासून अभिनंदन.यंदाचा जीवनगौरव पुरस्कार मात्र योग्य पत्रकारास दिला गेलाय.पंढरीनाथ सावंत या व्रतस्थ पत्रकाराची निवड केली गेली आहे.सावंत साहेबांचे आणि 2016 आणि 2017 मध्ये जीवनगौरव मिळालेले विजय फणशीकर आणि विवेकचे संपादक रमेश पतंगे यांचही अभिननंदन..


मुंबई : 
पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदिंना देण्यात येणाऱ्या इतर विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आज येथे घोषणा केली.

शनिवार दिनांक २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे तसेच ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

२०१८ चे पुरस्कार –

२०१८ साठीचे इतर विविध पत्रकारिता पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) – श्री. हरी रामकृष्ण तुगांवकर, दै. सकाळ
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – श्री. दिनेश गणपतराव मुडे, दै. लोकमत समाचार
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – श्री. मोहम्मद नकी मोहम्मद तकी, दै. वरक – ए – ताजा
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – श्री. महेश घनश्याम तिवारी, न्यूज १८ लोकमत
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) – श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे, दै. लोकमत
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) -श्री. अनिकेत बाळकृष्ण कोनकर, www.bytesofindia.com
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) – श्री. प्रवीण श्रीराम लोणकर, दै. महाराष्ट्र टाईम्स
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग – श्री. विजय बाबूराव निपाणेकर, मुक्त पत्रकार (या पुरस्कारामध्ये शासनाच्या रकमेव्यतिरिक्त दै. गावकरीने १० हजार रुपये पुरस्कृत केले आहेत) 
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग – श्री. संजय कृष्णा बापट, दै. लोकसत्ता
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – श्री. मोहन मारूती मस्कर – पाटील, दै. पुण्यनगरी
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – श्री. भगवान आत्माराम मंडलिक, दै. लोकसत्ता
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी), दै. लोकमत
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग – श्री. गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ ॲग्रोवन
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – श्री. योगेश प्रकाश पांडे, दै. लोकमत

डॉ. सुरेखा मुळे, चंद्रकांत पाटील यांना शासकीय गटातील पुरस्कार

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) हा मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ.सुरेखा मधुकर मुळे यांना जाहीर करण्यात आला. तसेच छायाचित्रकारांना देण्यात येणारा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) हा अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

२०१६ आणि २०१७ मधील घोषित पत्रकारिता पुरस्कार

२७ जुलै होणाऱ्या समारंभात सन २०१६ आणि २०१७ मधील पत्रकारिता पुरस्कारांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या पुरस्कारांचा आणि विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे –

२०१६  साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना आणि २०१७ चा पुरस्कार साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

इतर पुरस्कार –

५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

वर्ष २०१६ –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै.भास्कर, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै.गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई – सकाळ, कोल्हापूर
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर-(51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये १० हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, 
दै. लोकमत, लातूर
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग – अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष-२०१७ –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) – राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) – खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज १८ लोकमत, हिंगोली
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) – दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) – संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) – मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग – अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे – ५१ हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये १० हजारदै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) – जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै.पुढारी औरंगाबाद
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग – जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स,गोंदिया

वर्षा फडके – आंधळे, डॉ. किरण मोघे यांना शासकीय गटातील पुरस्कार

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) २०१६ हा मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०१७ साठीचा हा पुरस्कार जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

तसेच शासकीय गटातील छायाचित्रकारांना देण्यात येणारा केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) २०१६ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी यांना तर २०१७ साठीचा हा पुरस्कार अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०१६ –

प्रथम पारितोषिक आनंद पगारे (नाशिक), द्वितीय रोहित कांबळे (कोल्हापूर), तृतीय शशिकांत सुतार (कोल्हापूर)
उत्तेजनार्थ – महेश ढाकणे (औरंगाबाद), किसन हासे (अहमदनगर), मिलींद पानसरे (पुणे)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७ – 

प्रथम वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर), द्वितीय दीपक कुंभार (कोल्हापूर), तृतीय अंशुमन पोयरेकर (मुंबई)
उत्तेजनार्थ – प्रशांत खरोटे (नाशिक), राजेद्र धाराशिवकर (उस्मानाबाद), सुनिल बोर्डे (बुलढाणा), उमेश निकम (पुणे), सुशिल कदम (नवी मुंबई)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१८ –
उत्तेजनार्थ – सचिन वैद्य (मुंबई), विरेंद्र धुरी (मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर.
‘महान्यूज’ मधील मजकूर आपण ‘महान्यूज’च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here