बाळशास्त्री जांभेकर यांची 209 वी जयंती राज्यभर साजरी   

मुंबई ः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची 209 वी जयंती आज राज्यभर प्रथमच शासकीय स्तरावर साजरी करण्यात आली. सहयाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.राज्यात इतर शासकीय कार्यालयात देखील बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुप्पहार घालून अभिवादन करण्यात आले.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यभर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती ठिकठिकाणी साजरी केली गेली.
मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे की,बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रयत्नपूर्वक जतन करू यात..
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यातील जवळपास 300 तालुक्यात आणि 35 जिल्हयात बाळशास्त्रींची जयंती साजरी केली गेली.सिंधुदुर्ग,कणकवली,अलिबाग,कर्जत,चंदगड,सातारा,वाई,अंबाजोगाई,वडवणी,ताडकळस,करमाळा,जालना ,परभणी,बीड,अहमदनगर,नांदेड,अमरावती,बुलढाणा,गडचिरोली,नागपूर आणि तालुक्यात आणि जिल्हयात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.एस.एम.देशमुख यांनी दिलेल्या अभिवादन संदेशात म्हटले आहे की,’पत्रकारितेचे स्वरूप बदलले असले तरी बाळशास्त्री जांभेकरांनी घालून दिलेली पत्रकारितेची मूल्ये पत्रकारांनी जतन केली पाहिजेत’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here