राजस्थानातही ‘हम एक है’ चा नारा..

0
1012

महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रदीर्घ लढा दिला.त्यानंतर राज्यात कायदा झाला.हा संदेश आता देशभर पसरला असून सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे कोणतेच प्रश्‍न सुटणार नाहीत याची खात्री सर्वानाच पटली आहे.त्यामुळं महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेशमधील सर्व पत्रकार संघटना एकत्र येत येत्या 15 तारखेला भोपाळला आंदोलन करीत आहेत तर राजस्थानमध्ये पिंक सिटी जयपूरला सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत सरकारला आवाज दिला आहे.40 -40 वर्षे पत्रकारिता केलेले आणि विविध पत्रकार संघटनांशी जोडले गेलेले अनेक ज्येष्ठ पत्रकार एकत्र येत आवाज दो,हम एक है,हमारी मांगे पुरी करो,पत्रकार एकता झिंदाबादचे नारे देत आहेत.राजस्थानातील संभाव्य काळया कायद्याला पत्रकारांचा तर विरोध आहेच या शिवाय पत्रकार संरक्षण,मजिठिया,पेन्सन वाढ आदि मागण्यांसाठी पत्रकार एकत्र आलेले आहेत.या बदलाचे स्वागत केले पाहिजे.देश पातळीवर आता सर्वांनी एकत्र येत आपले प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी लढाई अधिक धारदार करण्याची गरज आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here