आमदारांचा न्यूजपेपर पुरवठा बंद कऱण्याचा इशारा रास्तच
मराठी पत्रकार परिषद वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पाठिशी
 
पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं सरकार सातत्यानं आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते ,या विरोधात पत्रकारांनी सरकारी बातम्यांवरच बहिष्कार टाकावा अशा सूचना अनेकदा केल्या जातात.मात्र ‘बातम्या देणं माध्यमांचं कामच आहे त्यामुळं असा निर्णय घेता येणार नाही’ असं सांगून या सूचना फेटाळल्या जातात.या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्याचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे की,कोणताही तात्विक आव न आणता ‘जे लोकप्रतिनिधी आपल्या मागण्यांकडं दुर्लक्ष करतात त्यांचा न्यूजपेपर पुरवठाच बंद करायचा इशारा त्यांनी दिला आहे.या निर्णयात मराठी पत्रकार परिषद खंबीरपणे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठिशी असून वृत्तपत्र विक्रेत्यांनी घेतलेल्या भूमिकेचं परिषद स्वागत करीत आहोत.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा महत्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रत्यांच्या प्रश्‍नांकडं पाहायला सरकारला वेळ नाही.वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी हे वृत्तपत्र विक्रेते गेली अनेक वर्षे करीत आहेत पण सरकार त्याकडं दुर्लक्ष करीत आहे.सरकार येतात,जातात मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्‍न आहे तेथेच आहेत.त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नांची दखल सरकार आणि लोकप्रतिनिधींनी घेतली नाही तर आमदार आणि खासदारांच्या घरी सकाळी सकाळी पडणारी वृत्तपत्रे बंद करण्याचा इशाराच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने दिला आहे.शिवाय रस्त्यावर उतरून देखील तालुका तालुक्यात आंदोलनं करण्याची विक्रेता संघटनेची तयारी सुरू आहे.
 
मराठी पत्रकार परिषद मागणी करीत आहे की,वृत्तपत्र विक्रत्यांचे प्रश्‍न सरकारने तातडीने सोडविले नाही तर मराठी पत्रकार परिषद देखील वृत्तपत्र विक्रेत्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज मुंबईत तसे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
 वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेची आजच्या मटात आलेली बातमी
अनेक वर्षे निवेदन, मोर्चे या माध्यमातून सरकारदरबारी पाठपुरावा करूनही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र त्याच स्तंभाचा घटक असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासह विविध मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
प्रसंगी आमदार व खासदारांच्या घरात वृत्तपत्रे टाकली जाणार नाहीत, असा इशारा या सभेत देण्यात आला आहे. राज्य संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली जात आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार या सभेत म्हणाले. २६ जानेवारी २०१६ रोजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी केवळ आश्वासनेच दिली, असे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सांगितले.
तालुका पातळीवर रस्त्यावर उतरून आंदोलने करावीत, आमदार व खासदार यांना निवेदने देणे, प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम तातडीने राबवावा, असे आवाहन यासभेत करण्यात आले. या सभेला संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्यध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, मार्गदर्शक गोपीनाथ चव्हाण, शिवगोंड खोत, भाऊसाहेब सूर्यवंशी, संघटन सचिव संजय पावसे, रघुनाथ कांबळे, राज्य संचालक मारुती नवलाई आणि सदा नंदूर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येत उपस्थित होते. या विशेष सभेस विभागीय उपाध्यक्ष दिनेश उके (गोंदिया), आण्णासाहेब जगताप (औरंगाबाद), विकास सूर्यवंशी (सांगली), संघटन सचिव विनोद पन्नासे (चंद्रपूर), अंबादास वाकोडे (परभणी), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), मार्गदर्शक अशोक डहाळे, भाऊसाहेब सूर्यवंशी, चेतन चौधरी (नांदेड), आण्णा गुंडे (इचलकरंजी), अरुण कोरे (कुर्डुवाडी), सुनील करपे (परभणी), गणेश भातुसे (तुळजापूर), बी. आर. वायभट (औरंगाबाद), प्रकाश उन्हाळे (शेगाव), राकेश आकरे (नागपूर), भाऊ राणे, रवी बावणे (यवतमाळ), जमीर शेख (वर्धा) यांच्यासह विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

1 COMMENT

  1. जय हो विजय हो मराठी पत्रकार संघ कि विजय हो……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here