राज्यातील मध्यम आणि छोटया वृत्तपत्रांच्या 

मालक -संपादकांची 8 जुलैला पुण्यात बैठक 

हाराष्ट्रातील छोटी आणि मध्यम वर्तमानपत्रे आज विविध प्रश्‍नांनी त्रस्त आहेत.एकीकडं भांडवलदारी वर्तमानपत्रांचं आक्रमण,आणि दुसरीकडं सरकारकडून होणारं दुर्लक्ष यामुळं ही जिल्हास्तरीय पत्रं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.सरकारी जाहिरातींची संख्या,आकार आणि दर हे कमी झालेले आहेत.उत्पादन खर्च वाढतो आहे.अंक विक्रीतून दमडाही मिळत नाही,कमर्शियल जाहिरातीत बडे मासे आणि इलेक्टॉनिकवाले वाटेकरी झाले आहेत.त्यातच आता पडताळीच्या निमित्तानं नवं लचांड या दैनिक आणि साप्ताहिकांच्या मागं लावलं जात आहे.त्यामुळं राज्यातील छोटया वर्तमानपत्रांच्या् मालकांमध्ये मोठी अस्वस्थता आणि संताप आहे.

सरकारच्या बातम्या हीच वर्तमानपत्रे प्राधान्यानं छापतात,आपल्या कार्यक्षेत्रातल्या शहरांच्या विकासातही या पत्रांचं मोठं योगदान असतं शिवाय असंख्य कुटुंबं या इन्डस्ट्रीयवर अवलंबून आहेत.त्यामुळं या पत्रांच्या प्रश्‍नांचा सरकार दरबारी सहानुभूतीपूर्वक विचार होणं आवश्यक आहे.दुदैर्वानं हा वर्ग असंघटीत आहे.आपसातील स्पर्धा आणि हेवेदावे यामुळं एकत्र येऊन सरकारबरोबर चार हात करावेत असा प्रयत्न कधी झाला नाही.ही सारी मंडळी मराठी पत्रकार परिषदेची केवळ सहानुभूतीदारच नाही तर सदस्यही आहेत अशा स्थितीत मराठी पत्रकार परिषद छोटया वर्तमानपत्रांच्या, साप्ताहिकांच्या प्रश्‍नांपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही.त्यामुळंच राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मालक संपादकांची एक महत्वाची बैठक मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने पुण्यात होत आहे.शनिवार दिनांक 8 जुलैला  2017 रोजी दुपारी 3 वाजता जांंभूळकर गार्डन,महापालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक सभागृहाच्या समोर,शिवरकर मार्ग,वानवडी,पुणे  या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे.या बैठकीसाठी जास्तीत जास्त मालक संपादकांनी उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केले आहे.या बैठकीत प्रश्‍नांवर चर्चा करून ठोस कृती कार्यक्रम निश्‍चित केला जाणार तसेच सर्व प्रश्‍नांचा निपटारा होईपर्यंत ही लढाई सुरू ठेवण्यासाठी एक अस्थाई समिती नियुक्त केली जाणार आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त मालक-संपादकांनी उपस्थित राहावे अशी विनंती आहे.

मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील पत्रकारांना संरक्षण कायदा मिळवून दिला,पेन्शनचा प्रश्‍न येत्या अधिवेशनात मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा परवा नागपूरमध्ये दिला आहे.छोटया वर्तमानपत्रांचे प्रश्‍न देखील याच निर्धारानं मार्गी लावण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.परिषद जे विषय हाती घेते ते तडीस नेते हा विश्‍वास पुन्हा एकदा आपण सार्थ करून देणार आहोत.त्यासाठी आपली साथ आणि सहकार्य हवे आहे.

बैठकी संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया खालील फोन क्रमांकावर संपर्क करता येईल.

शरद पाबळे ( पुणे विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद)    ९८२२०८३१११

सुनील वाळुंज ( पुणे शहर सचिव )                                ९८२२१९५२९७

बापुसाहेब गोरे ( अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ )               ९८२२२२२७७२

कृष्णकांत कोबल ( कार्याध्यक्ष,ुपुणे जिल्हा पत्रकार संघ)         ९८८१०९८३८०

सूचनाः 1) ही प्राथमिक बैठक असल्यानं स्वतंत्रपणे निमंत्रणं कोणालाही पाठविलेली नाहीत.
2) आपण बैठकीत उपस्थित राहात असल्याचे सुनील वाळूंज 9822195297 या क्रमांकावर थेट फोन करून                 किंवा एसएमएस पाठवून कळविल्यास व्यवस्थेच्यादृष्टीने सोयीचे होईल.
3) हा मसेज जास्तीत जास्त ग्रुपवर पुढे पाठवावा ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here