जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार

जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम करणारी संस्था press emblem campaign ने केला आहे..
ब्राझिलमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 170 पत्रकारांचे कोरोनानं बळी घेतले आहेत.. त्या पाठोपाठ पेरू 138,मेक्सिकोत 93 पत्रकारांचे बळी गेले तर भारत चौथ्या स्थानावर असल्याचे PEC ने म्हटले आहे.. भारतात 62 पत्रकार कोरोनाने बळी घेतल्याचे संस्थेचं म्हणणं आहे.. परंतू भारतातील आकडेवारी यापेक्षा किती तर जास्त असण्याची शक्यता एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.. कारण एकट्या महाराष्ट्रातच ऑगस्ट 20 ते एप्रिल 21 या कालावधीत 92 पत्रकारांचे बळी गेले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेने वेळोवेळी कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांची नावं आणि छायाचित्रं प़सिध्द केली आहेत.. मात्र जागतीक संस्थांनी नोंद घेताना भारताच्या ग्रामीण भागाची दखल घेतल्याचे दिसत नाही.. त्यामुळे भारतातील आकडेवारी कमी दिसते आहे.. प़त्यक्षात ती किती तरी जास्त आहे..
काही देशांनी बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिलेली आहे. भारत सरकारने देखील पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.. मात्र भारतात आतापर्यंत किती दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळाली त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. महाराष्ट्र सरकारने देखील दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकाना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी अशी एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. महाराष्ट्र सरकार अद्यापही या मागणीबाबत मौन बाळगून आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here