हषॅद कशाळकर यांना मानवी हक्क वाताॅ पुरस्कार

0
897

समथॅन संस्थेचे पुरस्कार जाहीर

वसई- _मुंबई विद्यापीठाचे संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि ‘समर्थन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २०१५चे महाराष्ट्र राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.मानवी हक्कांच्या बातम्यांतून मानवी हक्क मिळवून देण्यासाठी सक्रियतेने काम करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांतून दरवर्षी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पत्रकारांची निवड या क्षेत्रातील तज्ञांच्या समितीकडून करण्यात येते._पुरस्कार विजेते असे आहेत – *हर्षद कशाळकर (दै.लोकसत्ता, मुंबई),रामदास साळुंखे (दै.जनप्रवास,सांगली), संतोष पाटील (मी मराठी पालघर जिल्हा प्रतिनिधी)*.उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते- *ओमकार पोटे (दै. पुढारी पालघर), प्रताप मेटकरी (दै. सकाळ, सांगली), राजलक्ष्मी पुजारे-जोशी (दै.महाराष्ट्र टाईम्स,ठाणे).*विशेष उल्लेखनीय पुरस्कार विजेते- *भगवान खैरनार (दै.सकाळ,पालघर मुंबई), भास्कर सोनवणे (तत्कालीन बातमीदार दै.सकाळ, नाशिक).*
_कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन,मुंबई विद्यापीठ,कलिना,सांताक्रूझ,मुंबई येथे १० ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार्थींना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे._कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *समर्थन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित* राहणार आहेत. यावेळी *प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, राज्यसभा टीव्हीचे मुख्य संपादक गुरदीप सप्पाल,मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन,पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ.सुंदर राजदीप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.* _पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थनचे अध्यक्ष प्रवीण महाजन,उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी,संज्ञापन व पत्रकारिता विभाग मुंबई विद्यापीठ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे._

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here