माहिती आणि जनसंपर्क विभागाला
हवाय स्वतंत्र कॅबिनेट मंत्री..

माहिती आणि जनसंपर्क विभागाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही.. सरकारची प़तिमा तयार करणं आणि ती उंचावणं हे महत्वाचं काम या विभागाचं असतं.. त्यामुळेच प्रत्येक मुख्यमंत्री हा विभाग आपल्याकडंच ठेवतो.. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना विभागाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही..देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते देखील या विभागाकडे लक्ष देऊ शकले नाहीत. मागच्या सरकारात या विभागाला पूर्णवेळ राज्यमंत्री देखील नव्हता.. त्यामुळे येथे अधिकार्यांचंच राज्य होतं. . पोलिसी खाकयानंच विभागाचं कामकाज सुरू होतं.. महासंचालकपदी आयपीएस अधिकारी आणण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला होता.. अधिकारांमधील गटबाजीने हा विभाग पोखरला गेला.. सरकारची प्रतिमा तयार करण्याचं काम सोडून पत्रकारांमधये भांडणं लावणं, पंच्याहत्तरी उलटलेल्या पत्रकारांच्या जुन्या संघटनांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करणे असे उद्योग या विभागात सुरू होते.. त्यामुळे पत्रकारच नव्हे तर विभागातील प्रामाणिक, चांगले अधिकारी देखील या हडेलहप्पी कारभाराला कंटाळले होते..सीएमओत “ऊसणवारीवर” आणलेल्या मंडळींची या विभागातील लुडबुड एवढी वाढली होती की हा विभाग आपलीच प़तिष्ठा गमवून बसला होता.. अहंकारी सरकार म्हणून फडणवीस सरकारची राज्यात जी बदनामी झाली त्याला सीएमओ आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाचा मोठा हातभार होता हे नक्की..
आता उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येत आहे.. आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असेल की, हा विभाग त्यांनी सवत:कडे न ठेवता या विभागाला स्वतंत्र कॅबिनेट आणि राज्यमंत्री द्यावा.. असे झाले तर या विभागाशी संबंधित विषय घेऊन पत्रकारांना थेट कॅबिनेट मंत्र्यांना भेटता येईल.. कॅबिनेट मंत्री मिळाल्याने त्याला या विभागावर पूर्ण वेळ लक्ष देता येईल.. त्यातून काही अधिकरयांनी विभागात जी संस्थानं ऊभी केली आहेत ती खालसा होतील.. आणि या विभागाचं कामकाज पूर्ववत सुरळीत सुरू होईल.. या विभागाची उपयुक्तता शुन्यावर आणण्याची कामगिरी(?) काही अधिकरयांनी पार पाडली आहे.. विभागाला स्वतंत्र कॅबिनेट मंत्री मिळाल्यास विभागातील बेबंदशाहीला आळा बसेल असे वाटते.. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here