मुंबईः बिहार आणि मध्यप्रदेशात पत्रकारांच्या अंगावर गाडया चढवून त्यांची हत्त्या केल्याची काल घटना घडलेली असतानाच  केरळमध्ये आज पहाटेच दोन वाजता एका रेडिओ जॉकीची हत्या करण्यात आली.हल्लेखोर एवढे निर्ढावले आहेत की,स्टुडिओमध्ये घुसून  अत्यंत धारदार शस्त्राने आणि थंड डोक्याने ही हत्त्या केली गेली.राजेश उर्फ रसिकन राजेश (36) असं या जॉकीचं नाव आहे.तो काही दिवसांपुर्वीच दोहामधून भारतात परतला होता.या हल्ल्यात त्याचा मित्रही जखमी झाला आहे.
राजेश मिमिक्री आर्टिस्ट म्हणून प्रसिध्द होता.राजेश आणि त्याचा मित्र कुट्टून आपला कार्यक्रम आटोपून रात्री 2 वाजता स्टुडिओत बसले होते.कारमधून आलेले हल्लेखोर सरळ स्टुडिओत घुसले आणि त्यांनी दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.दोघेही जखमी झाले.दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.तेथे राजेशचे निधन झाले.

राजेशने ‘रेड एफएम’मध्ये आरजे म्हणून अनेक वर्ष काम केलं. त्याआधी तो दोहामधील ‘व्हॉईस ऑफ केरळ’ च्या एफएम स्टेशनसाठी काम करायचा. तो काही दिवसांपूर्वीच मायदेशी परतला होता. भारतात आल्यानंतर त्यानं मिमिक्री सुरू केली होती. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here