जोशी तो गये..

0
649

मुंबई कॉग्रेसचे मुखपत्र कॉग्रेस दर्शनमुळे मुंबई अध्यक्ष संजय निरूपण चांगलेच अडचणीत आले असून त्यांनी याचं खापर आता कंन्टेन्ड एडीटर सुधीर जोशी यांच्यावर फोडले असून त्यांच्यावर कारवाई कऱण्यात आली आहे.अकांतील चूक निरूपण यांनी मान्य केली असतानाच बंद पडलेले नियतकालिक मी पुन्हा सुरू केले असे सांगितले आहे.

मुंबई कॉंग्रसेचे मुखपत्र ‘काँग्रेस दर्शन’मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त लेख लिहिण्यात आला आहे.

या लेखातून पंडीत नेहरु यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत. नेहरु यांनी सरदार पटेल यांचे सल्ले ऐकले असते तर काश्मीर, तिबेट, चीनच्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. तसंच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी 1998मध्ये सरकार बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, असं म्हणत त्यांच्या नेतृत्त्वाबद्दलही मुखपत्रात टीका करण्यात आली आहे.

या मुखपत्राचे संपादक खुद्द मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे आहेत. निरूपम यांनी चूक मान्य करत अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही असे सांगितले व या प्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. मात्र, या प्रकरणामुळे विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्यासाठी हातात आयतं कोलीत मिळालंय.

 

– See more at: http://mimarathi.in/action-will-be-taken-those-who-did-mistake-in-cong-mouthpiece-case-says-nirupam#sthash.lcsks2Vb.dpuf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here