सिगलच्या थवे कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी मुरूडला पयर्र्टकांची गर्दी 

उरणपासून ते श्रीवर्धनपर्यंतचे अनेक समुद्र किनारे सध्या सिगलच्या वास्तव्यानं गजबतून गेले आहेत.दरवर्षी थंडीची चाहूल लागताच सैबेरियातून हे पक्षी रायगडच्या किनार्‍यावर येतात.साधारणतः जानेवारीच्या अखेरपर्यंत या पक्षाचं येथे वास्तव्य असते.मुरूडच्या विस्तीर्ण किनार्‍यावर या पक्षांचे सध्या थवेच्या थवे पर्यटकांचे आकर्षण बनले असून पहाटच्या रम्य वातावरणात सिगल निरिक्षणासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे.सिगलचा चिवचिवाट आणि पंख फुलविल्यानंतर आतील लालभडक रंग आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी पक्षी निरिक्षक गर्दी करीत आहेत.मात्र वाढते जल प्रदूषण तसेच मानवी आक्रमणामुळे उत्तरोत्तर मुरूडला येणार्‍या पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्याचे स्थानिकांचे म्ङणणे आहे.उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्‍यांवरही या पक्षांचे थवे दिसायला लागले आहेत..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here